Nashik Crime News : बहुचर्चित कापडणीस बापलेकांच्या खून खटल्याची सुनावणी ऑगस्ट महिन्यापासून सुरू होणार आहे. या खटल्यात सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील म्हणून ॲड. उज्ज्वल निकम हे सोमवारी (ता. १५) नाशिक जिल्हा न्यायालयासमोर उपस्थित झाले. दरम्यान या खटल्यातील संशयितांनी सादर केलेले जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावले आहेत. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे माजी कुलसचिव नानासाहेब कापडणीस, त्यांचा मुलगा डॉ. अमित कापडणीस यांचा खून झाल्याची घटना फेब्रुवारी २०२२ उघड झाली होती. (Regular hearing of Kapadnis murder case from August )
सरकारवाडा पोलिसांत याप्रकरणी दुहेरी खूनाचा गुन्हा दाखल असून, या खटल्यात शासनाने विशेष सरकारी म्हणून अॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केली आहे. तत्कालीन तपासी अधिकारी व वरिष्ठ पोलिस निरीक्षक साजन सोनवणे यांनी सखोल तपासाअंती सोळाशे पानांचे दोषारोपपत्र जिल्हा न्यायालयात दाखल केले आहे. सदरचा खटला जिल्हा न्यायालयाच्या पटला आला असून, याची नियमित सुनावणी येत्या १९ ऑगस्ट २०२४ पासून होणार आहे. या दुहेरी खून खटल्याच्या सुनावणीकडे नाशिककरांचे लक्ष लागून आहे.
असे आहे प्रकरण...
सरकारवाडा पोलिस ठाण्यामध्ये कापडणीस पिता-पुत्र बेपत्ता असल्याची तक्रार २८ जानेवारी २०२२ रोजी दाखल झाली होती. या तपासामध्ये नानासाहेब कापडणीस यांच्या खात्यातून ९० लाख संशयिताच्या खात्यात वर्ग झाले आणि त्याने ते मुख्य संशयित राहुल जगतापकडे दिल्याचे तपासातून समोर आले. त्यानंतर पोलिसांनी मोठ्या खुबीने या गुन्ह्याची उकल केली होती. संशयितांनी नानासाहेब कापडणीस यांचा मृतदेह मोखाडा, तर अमितचा राजूर येथे जाळून टाकत पुरावा नष्ट केला होता.
जगतापला राहत्या घरातून तर, फरार तिघांना छत्रपती संभाजीनगरमधून अटक करण्यात आली होती. संशयितांनी सावरकरनगर येथील कापडणीस यांचा बंगला, द्वारका येथील गाळा, त्याच पैशांतून घेतलेली कार, दुचाकी, पत्नीकडील महागडे मोबाईल व रक्कम असा मुद्देमाल पोलिसांनी तपासात जप्त केला असून त्याचे पुरावेही न्यायालयात सादर केलेले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.