Nashik Civil Hospital : सिव्हिलच्या आवारातच सांडपाण्याचे डबके; डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने रुग्णांसह नातेवाईक हैराण

Civil Hospital : जिल्हा शासकीय रुग्णालयात जिल्हाभरातून रुग्ण उपचारासाठी दाखल होतात. परंतु याच रुग्णालयाच्या आवारात सांडपाण्याचे डबके जागोजागी साचलेले आहेत.
Increase in mosquito population due to sewage
Increase in mosquito population due to sewageesakal
Updated on

Nashik Civil Hospital : जिल्हा शासकीय रुग्णालयात जिल्हाभरातून रुग्ण उपचारासाठी दाखल होतात. परंतु याच रुग्णालयाच्या आवारात सांडपाण्याचे डबके जागोजागी साचलेले आहेत. यामुळे दुर्गंधीसह डासांच्या प्रादुर्भावाला रुग्णांसह नातेवाइकांना सामोरे जावे लागते आहे. दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून जिल्हा रुग्णालयाच्या आवारात रस्त्यांसह ड्रेनेजचे काम सुरू असून, अनेक ठिकाणी ड्रेनेजचे पाणी तुंबून आरोग्याची समस्या निर्माण झाली आहे. (Relatives of patients are harmed due to increase in mosquito infestation )

यासंदर्भात जिल्हा रुग्णालयाने सार्वजनिक बांधकाम विभागाला ही कामे तत्काळ पूर्ण करण्यासंदर्भात आदेश दिले आहेत. जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये सिमेंट क्राँक्रिटच्या रस्त्यांची कामे सुरू आहेत. रस्त्यांची कामे करतानाच, ड्रेनेजचीही कामे केली जात आहेत. त्यामुळे जागोजागी खोदकाम केलेले आहे. जुन्या ड्रेनेज लाइनचे सांडपाणी वर येऊन त्याचे जागोजागी डबके साचत आहेत. या सांडपाण्यामुळे परिसरात दुर्गंधी तर आहेच, परंतु डासांचा प्रादुर्भावही वाढला आहे.

या डासांमुळे रुग्णालयातील रुग्णांसह त्यांचे नातलग चांगलेच हैराण झाले आहेत. जिल्हाभरातून रुग्ण याठिकाणी उपचारासाठी दाखल होतात. तर काही दिवसांवर पावसाळा येऊन ठेपला आहे. यामुळे पावसाळा सुरु होण्यापूर्वी ड्रेनेज लाइनची कामे पूर्ण करावी लागणार आहेत. पावसाळ्यात ड्रेनेज लाइनची कामे करताना अडचणी येण्याचीच जास्त शक्यता आहे. यासंदर्भात जिल्हा रुग्णालय प्रशासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाला कामे त्वरित पूर्ण करण्याचे सांगितले आहे.

Increase in mosquito population due to sewage
Dhule Civil Hospital: पूर्ववत क्षमतेने वैद्यकीय सेवा मिळण्यासाठी आमदार शाह मंत्र्यांकडे

प्लंबिंगच्या कामांची गरज

जिल्हा रुग्णालयाच्या जुन्या इमारतीच्या ड्रेनेज लाईन जोडण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी नवीन ड्रेनेज बनविलेले आहेत. परंतु जुनी ड्रेनेज लाईन तुंबल्याने सांडपाणी वर येते. तर दुसरीकडे जुन्या इमारतीची प्लंबिंगही खराब झालेली आहे. अनेक मजल्यावरील प्लंबिंगचे पाणी लिकेज होऊन ते पाइपबाहेर पडत असल्यामुळेही अनेक ठिकाणी पाणी तुंबलेले आहे. नवीन सिंहस्थ इमारतीच्या बाजूलाही तशीच स्थिती आहे.

फवारणीची मागणी

रुग्णालयाच्या आवारातच तुंबलेले सांडपाणी आणि त्यामुळे वाढलेला डासांचा प्रादुर्भाव, यामुळे रुग्ण हैराण आहेत. यासाठी रुग्णालयाच्या आवारात सायंकाळच्या वेळी डासप्रतिबंधक धूर फवारणीची मागणी होत आहे.

''नवीन रस्त्याची कामे आणि ड्रेनेज लाईन जोडण्याची कामे सुरू आहेत. विशेषत: ड्रेनेज लाइनचे काम त्वरित पूर्ण करण्यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाला सांगितले आहे.''- डॉ. चारुदत्त शिंदे, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय.

Increase in mosquito population due to sewage
Nashik Civil Hospital : मनपा रुग्णालयांमध्ये स्वतंत्र उष्माघात कक्ष; वैद्यकीय अधीक्षक डॉ. चव्हाण यांची माहिती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.