Nashik News : मुंबई नाका येथील माजी आमदार वसंत गिते यांच्या संपर्क कार्यालयाचे आठ दिवसापूर्वी महापालिकेकडून अतिक्रमण काढण्यात आले होते. मंगळवार (ता. ९) पुन्हा अतिक्रमणाची दुसरी कारवाई करत संपर्क कार्यालयास लागून असलेल्या पत्र्याचे शेडचे आणि बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा असलेला महाराष्ट्राचा नकाशा कमानीचे अतिक्रमण काढत महापालिकेकडून त्यांना दुसरा धक्का देण्यात आला. (Nashik Encroachment)
अशी चर्चा परिसरात सुरू होती. अधिवेशनात शहरातील अतिक्रमणाबाबत लक्षवेधी प्रश्न उपस्थित केल्यानंतर विविध भागात अतिक्रमण मोहीम राबविण्यात येत आहे. आठ दिवसापूर्वी माजी आमदार वसंत गिते यांच्या ४० वर्षांपूर्वीचे संपर्क कार्यालय महापालिका अतिक्रमण विभागाकडून जमीनदोस्त करण्यात आले. येथून अतिक्रमण मोहिमेस सुरवात करण्यात आली.
न्यायालयीन बाब असल्याचे सांगत त्या वेळी अतिक्रमण काढण्यास विरोध करण्यात आला होता. महापालिका अधिकाऱ्यांकडून विरोधात न जुमानता कार्यालयाचे अतिक्रमण काढण्यात आले. कार्यालयास लागून असलेले पत्र्याचे शेड आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे छायाचित्र असलेले महाराष्ट्र नकाशाची कमान स्वतःहून काढून घेण्यास काही अवधी देण्यात आला होता.
त्यानंतरही शेड काढण्यात आले नसल्याने मंगळवार (ता. ९) दुपारी पुन्हा त्या ठिकाणी अतिक्रमण मोहीम राबविण्यात आली. कमानीपासून मोहिमेस सुरवात करण्यात आली. मोहिमेस कुठल्याही प्रकारचे गालबोट लागू नये. याची खबरदारी घेत बाळासाहेब ठाकरे यांचे छायाचित्र असलेला महाराष्ट्राचा नकाशा व्यवस्थितरीत्या खाली उतरवण्यात येऊन सुरक्षित स्थळी ठेवण्यात आला. (latest marathi news)
त्यानंतर युवक मित्रमंडळ मुंबई नाका नाम फलक असलेल्या पत्र्याच्या शेड काढण्यात आले. शेडला लागून गणेश मंदिर असल्याने कुठलाही अनुचित प्रकार घडू नये. यासाठी जेसीबीचा वापर न करता गॅस कटर आणि दोर खंडाच्या साहाय्याने संपूर्ण शेडचे अतिक्रमण काढण्यात आले. शेडच्या एका बाजूस जेसीबी लावून काढण्याचा प्रयत्न केला असता उपस्थित कार्यकर्त्यांनी मज्जाव केला. काही वेळ तणाव निर्माण झाला होता.
अधिकाऱ्यांनी मात्र जेसीबी न लावता शेड काढण्याच्या सूचना केल्याने तणाव निवळला. सूडबुद्धीतून कारवाई केली जात असल्याचे माजी महापौर विनायक पांडे यांनी सांगितले. प्रचंड पोलिस बंदोबस्तात अतिक्रमण मोहीम राबविण्यात आली. अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे, उपायुक्त अतिक्रमण डॉ. मयूर पाटील, नगररचना कार्यकारी अभियंता प्रशांत पगार.
पूर्व विभागीय अधिकारी राजाराम जाधव, नवीन नाशिक विभागीय अधिकारी डॉ. सुनीता कुमावत, नाशिकरोड विभागीय अधिकारी तुषार आहेर, अग्निशामक विभाग प्रमुख संजय बैरागी, उपअभियंता रवींद्र बागूल, नितीन राजपूत, रवी घोडके, नवनीत भामरे, अभियंता प्रदीप भामरे, विद्युत विभागप्रमुख नितीन धामणे आदींच्या उपस्थितीत मोहीम राबविण्यात आली.
अग्निशामक बंबाचा वापर
महापालिका अतिक्रमण मोहिमेत प्रथमच अग्निशामक बंबाचा वापर करण्यात आल्याचे बघावयास मिळाले. संवेदनशील अतिक्रमण मोहीम आणि गॅस कटरच्या साहाय्याने काढण्यात येत असलेले अतिक्रमण लक्षात घेता. कुठल्या अनुचित प्रकार घडू नये. यासाठी मुंबई नाका अतिक्रमण मोहीम ठिकाणी अग्निशामक बंब तैनात करण्यात आला होता.
बाप्पाची आरती करत सदबुद्धीची प्रार्थना
मुंबई नाका येथील वसंत गिते यांच्या संपर्क कार्यालयाचे अतिक्रमण काढल्यानंतर उर्वरित पत्र्याच्या शेडचे अतिक्रमण काढण्याची मोहीम मंगळवारी राबविली. एकीकडे अतिक्रमण मोहीम सुरू असताना दुसरीकडे माजी महापौर विनायक पांडे आणि माजी उपमहापौर प्रथमेश गीते यांच्यासह श्री. गीते यांच्या समर्थकांच्या हस्ते कार्यालयास लागून असलेल्या बाप्पाच्या मंदिरात आरती करण्यात आली. सर्वांना सुबुद्धी देवो जणू अशी प्रार्थना करण्यात आली.
"निवडणुकीसाठी बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लागतो आणि आज त्यांचा फोटो असलेला महाराष्ट्राचा नकाशा फलक त्यांच्याकडून हटविण्यात आला. दुःखाची बाब आहे. केवळ कार्यालयाचे अतिक्रमण काढून वसंत गीते यांची लोकप्रियता कमी होणार नाही. आगामी निवडणुकीत जनता त्यांना दाखवून देतील वसंत गीते यांची लोकप्रियता. सूडबुद्धीने अतिक्रमण काढण्यात आले आहे."- विनायक पांडे, माजी महापौ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.