Nashik News : रुग्णालयांमधील पोलिस चौक्यांना लागेना मुहूर्त; महापालिकेकडून पोलिसांना स्मरणपत्र

Nashik : महापालिकेचे रुग्णालय व आरोग्य केंद्रांवर वारंवार हल्ले होत असल्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने दहा ठिकाणी पोलिस चौकी उभारण्याची मागणी पोलिस प्रशासनाकडे केली होती.
police
policeesakal
Updated on

Nashik News : महापालिकेचे रुग्णालय व आरोग्य केंद्रांवर वारंवार हल्ले होत असल्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने दहा ठिकाणी पोलिस चौकी उभारण्याची मागणी पोलिस प्रशासनाकडे केली होती. मात्र, अद्यापपर्यंत या मागणीवर पोलिस प्रशासनाकडून उत्तर न आल्याने महापालिकेकडून पोलिसांना पुन्हा स्मरणपत्र पाठविले जाणार आहे. शहरात महापालिकेचे पाच मोठे रुग्णालय व चार प्रसूतिगृह आहे. (Reminder to police from Municipal Corporation about police posts in hospitals )

यातील नाशिक रोड येथील हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे रुग्णालय आहे. त्याखालोखाल डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात मोठ्या प्रमाणात उपचारासाठी रुग्ण येतात. रुग्णालय संवेदनशील क्षेत्रामध्ये आहे. वारंवार येथे डॉक्टर, नर्स व स्टाफ बरोबर रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांचे वाद होतात.

बिटको रुग्णालयात रुग्णालयावर हल्ले होण्याचे प्रकार वारंवार घडतात. काही दिवसांपूर्वी महिला डॉक्टर वर हल्ला करण्यात आला होता. त्यामुळे डॉक्टरांसाठी नाशिक रोड येथील बिटको रुग्णालय हे असुरक्षित समजले जाते. वारंवार होत असलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या वतीने पोलिसांकडे पत्राद्वारे बिटको रुग्णालयात तातडीने पोलिस चौकीची मागणी करण्यात आली. (latest marathi news)

police
Nashik News : घंटागाड्या नियमित असूनही उघड्यावर कचरा; दंडात्मक कारवाई करण्याची जागृत नागरिकांची मागणी

बाळासाहेब ठाकरे रुग्णालया पाठोपाठ डॉ. झाकिर हुसेन रुग्णालय, पंचवटीतील इंदिरा गांधी रुग्णालय, मोरवाडी येथील श्री स्वामी समर्थ रुग्णालय, गंगापूर येथील हॉस्पिटल, मेनरोड येथील जिजामाता प्रसूतिगृह, सातपूर येथील मायको प्रसूतिगृह, उपनगर येथील प्रसृतीगृह, सिन्नर फाटा येथील सावित्रीबाई फुले प्रसूतिगृह येथे देखील महापालिकेला पोलिस चौकी हव्या आहेत.

मात्र, नाशिक रोड येथील ठाकरे व डॉ. हुसेन रुग्णालयातील मागणी अद्यापही पूर्ण झालेली नाही. त्यामुळे आता महापालिकेच्यावतीने पुन्हा पोलिस प्रशासनाकडे विनंती स्वरूपात मागणी केली जाणार आहे.

''नाशिकरोड येथे बाळासाहेब ठाकरे रुग्णालय व कथडा येथील हुसेन रुग्णालय महापालिका स्टाफसाठी असुरक्षित असल्याने प्रामुख्याने या दोन रुग्णालयासह इतर रुग्णालय व प्रसूतिगृहमध्ये पोलिस चौकी व्हावी, अशी मागणी पोलिस प्रशासनाकडे करण्यात आली. यासाठी पोलिसांना पुन्हा स्मरणपत्र देण्यात आले आहे.''-डॉ. तानाजी चव्हाण, वैद्यकीय अधीक्षक, महापालिका.

police
Nashik News : उत्पन्नवाढीसाठी मनपाच्या जागांवर 500 मोबाईल टॉवर; पहिल्या टप्प्यासाठी अधिसूचना

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.