Nashik Road Construction : खड्डे बुजविण्यासाठी ‘बांधकाम’ला अखेर मुहूर्त; नाशिक-छत्रपती संभाजीनगर महामार्गाची डागडुजी

Road Construction : आचोळा नाला परिसरात खड्डे बुजवण्यास सुरुवात झाली आहे.
Workers digging potholes in Achole Nala area.
Workers digging potholes in Achole Nala area.esakal
Updated on

निफाड : निफाड-नाशिक-छत्रपती संभाजी महामार्गावरील येथून जवळच असलेल्या आचोळा नाल्यावर कांदा वाहतूक करणारा ट्रॕक्टर खड्ड्यांमुळे उलटल्यानंतर वाहनचालकांमध्ये संतापाचे वातावरण होते. बांधकाम विभागाच्या नाकर्तेपणाचा प्रहार संघटनेने निषेध करीत खड्ड्यात साचलेल्या पाण्यातच ठिय्या आंदोलन केले होते. अखेर महामार्गावरील धोकादायक खड्डे बुजवण्याला मुहूर्त सापडला असून, ठिकठिकाणी डागडुजी केली जात आहे. (Repair of Nashik Chhatrapati Sambhaji Nagar Highway)

निफाड तालुक्यातील धारणगाव खडक येथील शेतकरी तुकाराम जाधव ट्रॅक्टरमधून कांदा घेऊन निफाड उपबाजार आवारात जात असताना आचोळा नाल्याजवळ ट्रॅक्टर उलटून त्यांचे आर्थिक नुकसान झाले होते. दरम्यान, नैताळे ते पिंपळसपर्यंत मोठ्या प्रमाणात महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांनी वाहनचालक, प्रवासी, शेतकऱ्यांचे हाल होत असल्यामुळे निफाडकर मेटाकुटीला आले असताना सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कारभाराविरोधात संतापाची लाट उसळली होती. (latest marathi news)

Workers digging potholes in Achole Nala area.
Nashik Road Construction : पावसाळ्यातही एकेरीच वाहतूक राहणार; भावडबारी ते देवळा

प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष सागर निकाळे यांनी त्याच साचलेल्या पाण्यात बसून आंदोलन केले. या घटनेस जबाबदार महामार्ग प्रशासनाने शेतकऱ्याला नुकसान भरपाई द्यावी, तातडीने महामार्गावरील सर्व खड्डे बुजविण्याची मागणी केली होती. याची दखल घेत आचोळा नाला परिसरात खड्डे बुजवण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, या खड्ड्यांची डागडुजी दर्जेदार व्हावी, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. नैताळे ते पिंपळस दरम्यानच्या खड्ड्यांची देखील तातडीने दुरुस्त व्हावी, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.

Workers digging potholes in Achole Nala area.
Road Construction : सरकारी काम अन् बारा महिने थांब! भडगाव तालुक्यात शेतरस्त्यांची कामे रखडली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.