नाशिक : केंद्र सरकारच्या पीएम बस योजनेअंतर्गत महापालिकेला ५० इलेक्ट्रिक बसेस मिळणार असल्याने त्यासाठी आडगाव येथे बस डेपो तयार केला जात आहे. मात्र त्यासाठी अंदाजपत्रकात अवघ्या सहा कोटी रुपयांची तरतूद केल्याने उर्वरित २१ कोटी ४७ लाख रुपये अनुदान मिळवण्यासाठी महापालिकेने (NMC) पुन्हा केंद्र सरकारकडे धाव घेत राष्ट्रीय हवा गुणवत्ता कार्यक्रमांतर्गत हा निधी मिळावा, अशी मागणी केली आहे. (Nashik NMC Electric Bus depot marathi news)
महापालिकेच्या सिटी लिंक कंपनीच्या माध्यमातून सद्यस्थितीमध्ये शहरात २०० सीएनजी तर ५० डिझेल अशा एकूण २५० बसेस चालविल्या जातात. केंद्र सरकारने पीएम योजनेअंतर्गत ५० इलेक्ट्रिक बस देण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी महापालिकेकडून आडगाव येथे इलेक्ट्रिक बस डेपो उभारणीचे काम हाती घेण्यात आले आहे.
बस डेपोसाठी सहा कोटी रुपये खर्चाला महासभेने मंजुरी दिली आहे. बस डेपो हा १०० इलेक्ट्रिक बससाठी तयार केला आहे. त्यासाठी २७ कोटी ४७ लाख रुपये खर्च येणार आहे. त्यामुळे उर्वरित २१ कोटी ४७ लाख रुपये अनुदान मिळवण्यासाठी महापालिकेने केंद्र सरकारकडे धाव घेतली. (Latest Marathi News)
महावितरणकडून सव्वा कोटीची मागणी
केंद्र सरकारने इलेक्ट्रिक बस बरोबरच ई-बस डेपोसाठीही निधी मंजूर केला आहे. त्यामध्ये ६० टक्के केंद्र सरकार देणार आहे तर ४० टक्के निधी महापालिकेला खर्च करावा लागणार आहे. त्यामुळे महापालिका आयुक्तांनी पंतप्रधान कार्यालयाशी पत्रव्यवहार करून निधीची मागणी केली आहे.
महावितरण कंपनीकडून २५ इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन उभे केले जाणार आहेत. तेथे वीज पुरवठा करण्यासाठी एक कोटी २५ लाख रुपयांचा निधी महावितरण कंपनीने महापालिकेकडे मागितला आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.