नाशिक : धनगर समाजाला आदिवासींमधून आरक्षण देऊ नये, या मागणीसाठी आक्रमक झालेल्या आदिवासी समाजाच्या विविध संघटनांनी सोमवारी (ता. ३०) जिल्ह्यातील विविध भागांत आंदोलन केली. घोटी, दिंडोरी, त्र्यंबकेश्वर तालुक्यात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्याचबरोबर १ ऑक्टोबरलादेखील आंदोलन करण्यात येणार आहे. ‘धनगर समाजाला आदिवासींमधून आरक्षण देऊ नये’ अशी मागणी आदिवासी समाजाने या वेळी केली. (Reservation issue Tribal community aggressive Dindori Trimbakeshwar along with Ghoti road stop movement )
दिंडोरी शहरात सकाळी मोठ्या संख्येने तालुका परिसरातील आदिवासी बांधवांनी एकत्रित येत रास्ता रोको आंदोलन केले. नाशिक-वणी रस्त्यावर आदिवासी समाजाचे रास्ता रोको आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली. सरकारकडे आदिवासी समाजाच्या मागणीकडे गांभीर्याने घ्यावे, असे आवाहन करण्यात आले. त्याचबरोबर आधीच आमच्या समाजात आरक्षण कमी असून, इतरांना समाविष्ट करू नये, अशी मागणी या वेळी आंदोलकांकडून करण्यात आली.
या वेळी असंख्य आदिवासी समाजबांधव रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळाले. त्र्यंबकेश्वर शहरातही आमदार हिरामण खोसकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. आदिवासींमधून आरक्षण देण्याची धनगर समाजाची मागणी चुकीची असून, आमचा त्याला विरोध आहे, अशी स्पष्ट भूमिका येथील आंदोलकांनी व्यक्त केली. आदिवासी विकास परिषदेतर्फे इगतपुरी तालुक्यातील घोटी टोलनाक्यावर रास्ता रोको करण्यात आला. (latest marathi news)
तसेच आदिवासी बांधवांनी एकत्र येत उलगुलानच्या घोषणा देता सरकारवर धारेवर धरले. आदिवासींच्या विरोधात असणाऱ्यांना धडा शिकविण्याची गरज आहे. सरकारकडून आदिवासी जमातीत धनगर जातीची घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत करण्यात येत आहे, यामुळे आम्ही रस्त्यावर उतरलो असल्याचे आंदोलकांकडून सांगण्यात आले.
आजही आंदोलन
आदिवासी संघटनांकडून ऑक्टोबरमध्ये राज्यभर आदिवासी जनआक्रोश आंदोलन केले जाणार असल्याची माहिती आहे. १ ऑक्टोबरला आदिवासी विकास परिषदेच्या माध्यमातून अनेक भागांत आंदोलन करण्यात येणार आहे. त्याचबरोबर घोटी टोलनाक्यावर आंदोलन होणार असल्याची संघटनांकडून देण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.