लोकल सुरू होणार असल्याने नाशिककरांना दिलासा! पायपीट थांबणार

nashik- kalyan local 1.jpg
nashik- kalyan local 1.jpg
Updated on

नाशिक रोड : मुंबईमध्ये लोकल सुरू होणार असल्याने नाशिककरांना दिलासा मिळाला आहे. मनमाडपासून नाशिककर मुंबईला रोज प्रवास करतात. त्यामुळे अनेकदा बसने प्रवास करावा लागायचा. आता लोकल सुरू झाल्याने नाशिककरांना नियोजित ठिकाणापर्यंत पोचणे शक्य होणार असून, पायपीट थांबणार असल्याचे प्रवाशांनी सांगितले. 

मुंबईकरांसह नाशिककर प्रवासी सुखावला

मुंबईला जाण्यासाठी सकाळी पंचवटीने मनमाडपासून नाशिककर प्रवास करतात. उद्योग, व्यवसाय, नोकरी, खासगी कामांसाठी नाशिककर रोज जिवाची मुंबई करतात. लाॅकडाउनदरम्यान लोकल बंद करण्यात आल्या होत्या. त्या सुरू करण्यात येणार असून, नाशिककरांना कसाऱ्यापर्यंत पोचल्यानंतर पुढे कनेक्टिव्हिटी वाढणार आहे. सोयीनुसार मंत्रालय दादर- माटुंगा- सायन- भाईंदर- चिंचपोकळी- बोरिवली- पनवेल- मुलुंडसह अन्य स्थानकांपर्यंत हवा तसा प्रवास करणे सोपे होणार आहे. मुंबईमध्ये लोकल सुरू होणार असल्याने मुंबईकरांसह नाशिककर प्रवासी सुखावला आहे.  

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com