Nashik News : सिडकोतील शुभम पार्क परिसरातील एका नागरी रहिवासी इमारतीच्या आवारात शुक्रवारी (ता. २०) सकाळी ड्रेनेज तुंबल्याने मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली. सिडकोत अनेक वेळा ड्रेनेज तुंबून दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर पाहताना दिसून येते. एकाच दिवशी सिडको परिसरातील तीन ठिकाणी ड्रेनेज तुंबल्याने महापालिकेच्या कारभारावर नागरिकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे. (Residents of Cidco shocked due to problem of drainage blockage)
देवांग डेअरी परिसरात मोठ्या प्रमाणात सांडपाणी पसरल्याने नागरिकांना दुर्गंधीला सामोरे जावे लागले. सकाळी नागरिकांना कामावर जाण्याची घाई असल्या कारणाने आणि अशातच अशा दुर्गंधी पसरल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला. वेळोवेळी ड्रेनेजची साफसफाई होत नसल्यामुळे त्या नेहमीच तुंबतात, अशी नागरिकांची ओरड आहे.
दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे नागरिकांना रस्त्यावरून चालणे मुश्कील होते. त्याचप्रमाणे कामटवाडे, डीजीपीनगर लिंक रोडवर अशाच प्रकारे ड्रेनेज तुंबल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले. धन्वंतरी महाविद्यालय परिसरात एका गल्लीत ड्रेनेज तुंबल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात सांडपाणी बराच वेळ वाहत होते.
एकाच दिवशी सिडको परिसरातील तीन ठिकाणी ड्रेनेज तुंबल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. सांडपाणी रस्त्यावर वाहत असल्याने आरोग्य धोक्यात आले आहे. नागरिकांकडून महापालिकेच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे. लवकरात लवकर साफसफाई करावी, अशी मागणी होत आहे. (latest marathi news)
"अनेक ठिकाणी ड्रेनेज तुंबून दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावरून वाहते. दलदल तयार होते. त्यामुळे रस्त्यावरून चालणे, फिरणे कठीण होऊन जाते. परिसरात यामुळे मोठ्या प्रमाणात डासांची पैदास वाढली आहे. प्रशासनाने तत्काळ यावर उपाययोजना कराव्यात."
- आशा भिसे, स्थानिक महिला
"महापालिकेकडून वेळोवेळी स्वच्छता न झाल्यामुळे असे प्रकार नेहमीच बघायला मिळतात. तक्रारी करूनही ड्रेनेज लाइनची साफसफाई केली जात नाही. त्यामुळे ड्रेनेज तुंबल्याच्या घटना नेहमीच समोर येतात."-प्रशांत तोटे, स्थानिक नागरिक
"तुंबलेल्या ड्रेनेजमुळे स्थानिक लोकप्रतिनिधींना कळविले असता ते महापालिकेला फोन करून सांगतात. पण कर्मचारी दुरुस्तीसाठी येईपर्यंत मोठ्या प्रमाणात सांडपाणी वाहत असते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागतो."- राजाराम वाघ, स्थानिक नागरिक
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.