Nashik News : खड्ड्यांवरून गंगापूर रोडचे रहिवासी एकवटले! महापालिका प्रशासनाचा अनोख्या पद्धतीने निषेध

Latest Nashik News : हटके पद्धतीने झालेल्या आंदोलनात खड्ड्यांमुळे जखमी झालेल्या नागरिकांवर उपचार, तर वाहनांची दुरुस्तीदेखील करून लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला.
During the protest at Gangapur Road over potholes in the road
During the protest at Gangapur Road over potholes in the roadesakal
Updated on

Nashik News : एकीकडे नवरात्रोत्सवाची धामधूम सुरू असताना दुसरीकडे रस्त्यातील खड्ड्यांमुळे नाशिककर त्रस्त झाले आहेत. या त्रासाला वाचा फोडण्यासाठी शनिवारी (ता. ५) गंगापूर रोड भागात स्थानिक नागरिकांनी मोठे आंदोलन उभे करत महापालिका प्रशासनाचा निषेध केला. हटके पद्धतीने झालेल्या आंदोलनात खड्ड्यांमुळे जखमी झालेल्या नागरिकांवर उपचार, तर वाहनांची दुरुस्तीदेखील करून लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला. (Residents of Gangapur Road gathered for pits)

मागील तीन ते चार वर्षांपासून शहरातील रस्त्यांवर पंधराशे कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. मात्र पावसाचा रस्ते खराब होतात. रस्त्यावरील खडी पसरून वाहनांचे अपघात होतात. मोठ्या प्रमाणात रस्त्यांवर खड्डे पडले आहे. लोकप्रतिनिधींकडून महापालिकेला धारेवर धरण्याचा फक्त देखावा केला जातो.

प्रत्यक्षात मात्र फिल्डवर काम दिसत नाही. आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनीदेखील शहरातील खराब झालेल्या रस्त्यांची पाहणी केली. मात्र, अद्यापपर्यंत रस्ते दुरुस्त झालेले नाही. नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे महापालिका मुख्यालयात आंदोलन करण्याऐवजी गंगापूर रोड येथील निर्मला कॉन्व्हेंट शाळेजवळ नगर व नरसिंहनगर येथे नागरिकांनी शनिवारी सकाळी अनोख्या पद्धतीने आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले.

आंदोलनात बाळासाहेब अहिरराव, पंकज जाधव, अनिल सोनवणे, पुरुषोत्तम पटेल, रमेश जाधव, कुणाल बोरसे, राकेश सिंग, अनिल भिडे, रवींद्र आव्हाड, किरण अहिरे, गांगुर्डे आबा, शांताराम वाघ, मयूर चौधरी, दिनेश रघुवंशी, अविनाश ढोली, गणेश पवार, प्रशांत शेवाळे, लव- कुश सानप, रवींद्र आव्हाड, कपिल करंजकर, उमेश पाटील, नितीन पाटील, दीपक शिंदे, दीपक देवरे, अनिल ठाकरे, राज जगदाळे, हेमंत चौरे, सागर ठाकरे आदींनी सहभाग घेतला. (latest marathi news)

During the protest at Gangapur Road over potholes in the road
Nashik NMC News : भूसंपादनाचा चेंडू उपसंचालकांच्या कोर्टात!

जखमींवर उपचार, सुखरूप प्रवाशांचा सत्कार

पाठपुराव्यानंतरही प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याने नागरिकांनी अनोखे आंदोलन केले. खड्ड्यातील रस्त्यांवरून सुखरूप जाणाऱ्यांचा सत्कार केला. खड्ड्यांमुळे जखमी वाहनधारकांवर तत्काळ डॉक्टरांकडून उपचार करण्यात आले.

खड्ड्यांमुळे नुकसान झालेल्या वाहनांची दुरुस्ती केली. खड्डे दर्शन हेच नाशिकचे पर्यटन, गंगापूर रोड खड्डेमुक्त करा, प्रशासनाचा करायचं काय, या आशयाचे फलक घेऊन नागरिक रस्त्यावर उतरले. आंदोलन करताना काळे गणवेश परिधान करूनदेखील प्रशासनाचा निषेध केला.

"महापालिकेतून पाठपुरावा करूनदेखील कारवाई झाली नाही. त्यामुळे आंदोलन करण्याची वेळ आली आहे. प्रशासनाने आता तरी लक्ष द्यावे, अन्यथा यापेक्षा मोठे आंदोलन करू."

- किशोर शिरसाट, सामाजिक कार्यकर्ते.

During the protest at Gangapur Road over potholes in the road
Killari Rain Update : किल्लारीत मुसळधार, तेरणा नदीला पूर; निलंगा तालुक्यातील शेतकऱ्यांचे सोयाबीन पाण्यात

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.