महापालिका प्रशासक काळात अधिकाऱ्यांच्या मुजोरीला नाशिककर त्रस्त

Nashik municipal corporation
Nashik municipal corporation esakal
Updated on

सातपूर (जि. नाशिक) : सातपूर मनपा विभागीय अधिकारी नितीन नेर यांना विविध समस्यांबाबत भाजप (BJP) मंडलतर्फे निवेदन देण्यात आले. आठ दिवसात समस्या न सुटल्यास जन आंदोलनाचा इशारा भाजपने दिला आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की धरणात मुबलक साठा असताना सातपूरला कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. दीड- दोन महिन्यांपासून कोरोना लसीचे डोस बंद आहे. सातपूरला घंटागाडी नियमित येत नाही. सातपूर विभागात शेकडो कचऱ्याचे ब्लॅक स्पॉट असून, प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. धूर फवारणीच्या नावाखाली नागरिकांच्या खोट्या सह्या घेऊन मनपा ठेकेदारांची आर्थिक लुटीला अधिकाऱ्यांचे छुपे समर्थन आहे का, असा सवाल निवेदनात उपस्थित करण्यात आला आहे.

Nashik municipal corporation
नाशिक : त्रिमूर्ती चौक उड्डाणपूल विरोधात मनसेची जनहित याचिका

रस्त्यावरील धनधांडग्याचे अतिक्रमण न काढता, गोरगरीब जनतेला त्रास दिला जात आहे. अनेक उद्यान, क्रीडांगण, जॉगिंग ट्रॅक आणि ग्रीन जिम उद्यानांमध्ये पाणी मारले जात नाही. साफसफाई व डागडुजी होत नाही. या वेळी माजी सभागृह नेते दिनकर पाटील, सातपूर भाजप मंडल अध्यक्ष भगवान काकड, भाजप युवा मोर्चाचे शहर उपाध्यक्ष अमोल पाटील, माजी प्रभाग सभापती रवींद्र धिवरे, गणेश बोलकर, राजेश दराडे, ॲड. महेंद्र शिंदे, प्रवीण पाटील, रवींद्र जोशी, नीलेश भंदुरे, नन्हेलाल यादव, शुभम चिखले आदी पदाधिकाऱ्यांसह परिसरातील नागरिक उपस्थित होते.

Nashik municipal corporation
नाशिक : गुढीपाडवा परवानगी वादात पालकमंत्री भुजबळांची मध्यस्थी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.