Nashik News : गॅस पाइपलाइन खोदकामामुळे रहिवासी त्रस्त; चुकीच्या पद्धतीने खड्डे बुजविल्याने सर्वत्र मातीचे ढिगारे

Nashik : येथील एकदंतनगर परिसरात गॅस पाइपलाइन टाकण्यासाठी खोदकाम करून पुन्हा चुकीच्या पद्धतीने खड्डे बुजविल्याने सर्वत्र मातीचे ढिगारे रस्त्यावर पसरले आहेत.
Weathering of roads due to gas pipeline digging.
Weathering of roads due to gas pipeline digging.esakal
Updated on

Nashik News : येथील एकदंतनगर परिसरात गॅस पाइपलाइन टाकण्यासाठी खोदकाम करून पुन्हा चुकीच्या पद्धतीने खड्डे बुजविल्याने सर्वत्र मातीचे ढिगारे रस्त्यावर पसरले आहेत. नागरिकांना दुचाकी तसेच चारचाकी वाहने आणण्यास विविध अडचणी निर्माण होत असल्याने नागरिकांनी महापालिकेच्या ढिसाळ कारभारावर संताप व्यक्त केला आहे. तसेच चुकीच्या पद्धतीने खोदकाम करणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे. ()

जुना प्रभाग क्रमांक 28 मध्ये एकदंतनगर परिसर आहे. या ठिकाणी शेकडो रो- हाऊस तसेच अपार्टमेंट, सोसायटी आहेत. गेल्या काही दिवसांपासून सदर परिसरात गॅस पाइपलाइन टाकण्यासाठी महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीकडून खोदकाम करण्यात आले आहे. यासह महापालिकेचे ड्रेनेज तसेच पाणीपुरवठा विभागाचे ही किरकोळ कामे सुरू आहेत. खोदकाम झाल्यानंतर चुकीच्या पद्धतीने खोदकाम बुजविण्यात आले आहे.

यामुळे येथील अंतर्गत रस्त्यांवर ठिकठिकाणी मातीचे ढिगारे पसरले आहे. सोसायटींमधून तसेच आपल्या घरासमोरून बाहेर पडताना नागरिकांना स्वतःची वाहने आणण्यास विविध अडथळे निर्माण होत आहे. यासह अनेक ठिकाणी पाण्याची पाइपलाइन तसेच पथदीपांच्या केबल तुटल्याने रात्री अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. तर विविध ठिकाणी पाणी गळती झाली आहे. (latest marathi news)

Weathering of roads due to gas pipeline digging.
Nashik News : ऑफलाइन देयकांना 12 एप्रिलपर्यंत मुभा; मार्चअखेरची बिले मंजुरीसाठी मुदतवाढ

नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत असल्याने याबाबत महापालिकेच्या बांधकाम विभागाला तक्रारी करण्यात आल्या होत्या. मात्र बांधकाम विभागाचे अधिकारी या ठिकाणी दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. लवकरात लवकर रस्ता सुरळीत करावा व नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी एकदंतनगरवासीयांनी केली आहे.

दुरुस्तीस टाळाटाळ

नाशिक शहरासह सिडको परिसरात शेकडो किलोमीटरचे रस्त्यांवर गॅस पाइपलाइन टाकण्यासाठी खोदकाम करण्यात आले आहे. खोदकामापूर्वी संबंधित कंपनीने महापालिकेला रस्ते खोदकामाची शेकडो कोटींची नुकसान भरपाई दिली आहे. रस्त्यांवर खोदकाम करून पाच ते सहा महिने उलटले असले तरीही संबंधित महापालिकेचा बांधकाम विभाग आता रस्त्यांची डागडुजी दुरुस्ती तसेच डांबरीकरण करण्यास चालढकल करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

Weathering of roads due to gas pipeline digging.
Nashik News : पाटबंधारे विभागाकडून 103 कोटींची विक्रमी वसुली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.