Nashik News : वैद्यकीय सेवा पुरविण्याची जबाबदारी महापालिकेवर; जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना

Nashik: उष्णतेचे प्रमाण सातत्याने वाढत असल्याने त्याचा परिणाम निवडणुकीवर होण्याची शक्यता गृहीत धरून जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आरोग्य व वैद्यकीय सुविधा सज्ज ठेवण्याच्या सूचना महापालिकेला दिल्या आहेत.
Nashik District Collector Office
Nashik District Collector Office esakal
Updated on

Nashik News : उष्णतेचे प्रमाण सातत्याने वाढत असल्याने त्याचा परिणाम निवडणुकीवर होण्याची शक्यता गृहीत धरून जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आरोग्य व वैद्यकीय सुविधा सज्ज ठेवण्याच्या सूचना महापालिकेला दिल्या आहेत. २०५ शाळांमध्ये दिव्यांग मतदारांसाठी व्हीलचेअर, रुग्णवाहिका व राखीव खाटा सज्ज ठेवण्याच्या सूचनांचा समावेश आहे. (Nashik responsibility of providing medical services is on municipal corporation Collector instructions)

त्या अनुषंगाने महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने औद्योगिक संघटना व अन्य सामाजिक संघटनांकडून व्हीलचेअर, डॉक्टर, रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याचे आवाहन केले आहे. नाशिक लोकसभा निवडणुकीसाठी २० मेस मतदान होत आहे. निवडणुकीच्या निमित्ताने वैद्यकीय आरोग्यसेवा पुरविण्याची जबाबदारी महापालिकेवर आहे.

मे महिन्यात मोठ्या प्रमाणात उष्णतेचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. परिणामी, मतदान केंद्रांवरील कर्मचाऱ्यांना त्रास होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर तापमानामुळे मतदारांना देखील त्रास होण्याची शक्यता गृहीत धरून वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत. (Latest Marathi News)

Nashik District Collector Office
Nashik ZP News : स्वीप, कॉफी टेबल बुक तयारीत दुष्काळाचा विसर; जिल्हा परिषदेकडून दुष्काळ आढावा बैठक होईना

महापालिकेचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. तानाजी चव्हाण यांनी इंडियन मेडिकल असोसिएशन, निमा, प्रायव्हेट मेडिकल असोसिएशन, फॅमिली प्रॅक्टिशनर असोसिएशन, सातपूर-अंबड डॉक्टर असोसिएशन, जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशन या संघटनांची बैठक घेतली. मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर वैद्यकीय सुविधांची गरज भासणार असल्याने सेवा देण्याचे आवाहन डॉ. चव्हाण यांनी कले.

सामाजिक दायित्वाच्या निधीतून मोठ्या रुग्णालयांनी वैद्यकीय सुविधा देण्याचे देखील आवाहन केले. दरम्यान, सद्यःस्थितीमध्ये ६४ व खासगी रुग्णालयांकडून २५ रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. शहरात २०५ ठिकाणी एक हजार २६७ मतदान केंद्र आहे. त्या ठिकाणी वैयक्तिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

Nashik District Collector Office
Nashik Manohar Karda Case : अशोक कटारिया उपनगर पोलिसांसमोर 'हजर'! कारडा आत्महत्या प्रकरणी भारती कारडा यांचा जबाब

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.