नाशिक : उन्हाळ कांद्याचे भाव प्रतिक्विंटल चार ते साडेचार हजार रुपयांवर पोहोचल्यानंतर अफगाणिस्तानचा कांदा आयात करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. पंजाबमार्गे आयात झालेला कांदा भारताला फक्त तीन दिवस पुरेल एवढाच असल्याने त्याचा कांद्याच्या दरावर काहीच परिणाम होणार नाही., असे कृषी क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे. भारतीयांना दिवसाला ३५ हजार टन कांद्याची आवश्यकता असते. (result of Afghan onion is zero enough onions in Afghanistan will last India for 3 days )
अफगाणिस्तानात उत्पादित केला जाणारा संपूर्ण म्हणजेच एक लाख ४१ हजार टन कांदा भारतात आणला तरी तो अवघे तीन दिवस पुरेल. त्यामुळे कांदा आयातीची अफवा पसरवून भाव पाडण्याचे राजकारण सुरू असल्याचे दिसून येते. जिल्ह्यात १० ते १५ टक्के उन्हाळ कांदा शिल्लक आहे. सद्यःस्थितीला ५० हजार क्विंटल उन्हाळ व लाल कांदा कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये विक्रीसाठी येत आहे.
प्रतवारीनुसार त्याला किमान साडेतीन हजार ते कमाल पाच हजार २०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळतो. त्यामुळे शेतकरी समाधानी दिसत असला तरी कांदाच कमी शिल्लक असल्याने फारच कमी शेतकऱ्यांना याचा लाभ होतो. अशा परिस्थितीत केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात शुल्क हटविले. किमान निर्यातमूल्य २० टक्क्यांपर्यंत कमी केले आहे.
परिणामी, निर्यात खुली केली म्हणून शेतकऱ्यांची सहानुभूती मिळेल, अशी अपेक्षा सरकारला असताना आता अफगाणिस्तानातून २०० क्विंटल कांदा अमृतसरमार्गे भारतात दाखल झाला आहे. हा कांदा एकट्या नाशिक जिल्ह्यालाही पुरणार नाही, एवढाच असल्याने त्याचा कांद्याच्या भावावर काहीच परिणाम होणार नसल्याचे कृषितज्ज्ञांनी म्हटले आहे. याउलट अफगाण कांद्याच्या आडून व्यापारी गैरफायदा घेऊन कांद्याचे भाव कमी करण्याची शक्यताच अधिक आहे. (latest marathi news)
बुधवारी भाव ‘जैसे थे’
उन्हाळ कांद्याला जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये बुधवारी (ता. २५) सरासरी चार हजार ते चार हजार ८०० रुपये दर मिळाला. प्रमुख बाजार समित्यांमधील लाल व उन्हाळ कांद्याच्या दरात कुठलीही घसरण झालेली नाही.
कांद्याची स्थिती
बाजार समिती.......किमान.........कमाल........सरासरी
नाशिक..............३,४००............४,५००........४,०००
लासलगाव..........४,०००...........४,९६२........४,७७०
चांदवड................२,०१४...........४,८८०........४,७००
मनमाड...............१,१७९...........५,०००.........४,६७५
सटाणा................९००.............५,२००.........४,७५०
पिंपळगाव बसवंत....२,५००...........५,४००.........४,८०००
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.