Tribal Ashram School : आदिवासी आश्रमशाळांचा निकालाचा टक्का वाढला

Nashik News : राज्यातील आदिवासी आश्रमशाळांमधील गुणवत्तावाढीसाठी विभागाकडून सुरू असलेल्या प्रयत्नांना यश मिळाले आहे. आश्रमशाळांमधील बारावीपाठोपाठ दहावीचा निकालाचा टक्का वाढला.
Tribal Ashram School (file photo)
Tribal Ashram School (file photo)esakal
Updated on

Nashik News : राज्यातील आदिवासी आश्रमशाळांमधील गुणवत्तावाढीसाठी विभागाकडून सुरू असलेल्या प्रयत्नांना यश मिळाले आहे. आश्रमशाळांमधील बारावीपाठोपाठ दहावीचा निकालाचा टक्का वाढला. यंदा शासकीय आश्रमशाळांचा ९८ टक्के, तर अनुदानित आश्रमशाळांचा ९६ टक्के निकाल लागला आहे. (result percentage of tribal ashram schools has increased)

राज्यातील तब्बल २८१ आश्रमशाळांचा निकाल हा १०० टक्के लागला. सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात शासकीय आश्रमशाळांचा ९३.७२ टक्के, तर अनुदानित आश्रमशाळांचा ९०.४१ टक्के निकाल लागला होता. राज्याच्या आदिवासी विकास विभागाकडून शाळांच्या गुणवत्तावाढीसाठी विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. यात विद्यार्थ्यांची वर्षभरात तीनदा चाचणी घेण्यात आली.

यात, कमी गुणवत्ता असलेल्या शाळांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले. याशिवाय, शिक्षकांची चाचणी घेऊन त्यांना प्रशिक्षण देण्यात आले. प्रकल्पांतर्गत अधिकाऱ्यांची बैठक घेऊन गुणवत्तावाढीवर चर्चासत्र झाले. परिणामी, यंदा बारावी व दहावीचा निकाल चांगला लागला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्चमध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत आश्रमशाळांचा निकाल हा ९६.०२ टक्के लागला.

गत वर्षापेक्षा यंदा निकालाची टक्केवारी उंचावली. दहावीच्या निकालातही टक्केवारी उंचावली आहे. राज्यात आदिवासी शासकीय आश्रमशाळा ४९७, तर अनुदानित आश्रमशाळा ५४२ आहेत. यात विभागनिहाय आश्रमशाळेत विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण मिळाले. याची यादी करण्याचे काम सुरू असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले. (latest marathi news)

Tribal Ashram School (file photo)
Nashik Tribal Development : ‘आदिवासी विकास’चे 42 कोटींचे लेखन साहित्य निविदा वादात?

१०० टक्के निकाल लागलेल्या आश्रमशाळांची संख्या

विभाग एकूण शासकीय आश्रमशाळा १०० टक्के गुणप्राप्त आश्रमशाळा एकूण अनुदानित आश्रमशाळा १०० टक्के प्राप्त आश्रमशाळा

नाशिक २१३ १२५ २११ १०८

ठाणे १२६ ६४ ७२ २३

अमरावती ८२ ४२ १२३ ५५

नागपूर ७६ ५० १३३ ४९

"विभागातील अधिकारी, शाळा मुख्याध्यापक, शिक्षकांनी केलेल्या मेहनतीमुळे निकाल उंचावला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा निकालाची टक्केवारी वाढली आहे. जे विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत, त्यांनी निराश न होता जुलैमध्ये होणाऱ्या परीक्षेत यशस्वी व्हावे. पुढील वर्षी १०० टक्के निकाल लागण्याच्या दृष्टीने विभागाकडून नियोजन आहे." - नयना गुंडे, आयुक्त, आदिवासी विकास विभाग

Tribal Ashram School (file photo)
Nashik Tribal Development : निविदा तक्रारी शासनाच्या कोर्टात! आदिवासी विभागाने मागविले मार्गदर्शन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.