नाशिक : संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या विधानसभा निवडणुकीत फक्त मालेगाव मध्य या मतदारसंघात फेरमतमोजणी झाल्याने ऐन थंडीत प्रशासन अधिकाऱ्यांना घाम फुटला. उर्वरित १४ ठिकाणी अपेक्षित वेळेप्रमाणे निकाल घोषित झाल्याने जिल्हा प्रशासनाने सुटकेचा निःश्वास सोडला. जिल्ह्यात एकूण १५ जागांसाठी १९६ उमेदवार रिंगणात उतरले होते. जिल्ह्यात बुधवारी (ता. २०) सरासरी ६९.१२ टक्के मतदान झाले. मतदानाची टक्केवारी वाढल्याने निकालाविषयी उत्कंठा निर्माण झालेली होती. ()