CBSE 12th Result : सीबीएसई बोर्ड बारावीच्‍या परीक्षेत विद्यार्थ्यांचे यश!

Nashik News : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) यांच्‍यातर्फे आयोजित केलेल्‍या इयत्ता बारावीच्‍या परीक्षेचे निकाल सोमवारी (ता.१३) ऑनलाइन पद्धतीने जाहीर केले.
CBSE 12th Result
CBSE 12th Result esakal
Updated on

Nashik News : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) यांच्‍यातर्फे आयोजित केलेल्‍या इयत्ता बारावीच्‍या परीक्षेचे निकाल सोमवारी (ता.१३) ऑनलाइन पद्धतीने जाहीर केले. या परीक्षेत नाशिक शहर परीसरातील कनिष्ठ महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी यशस्वी कामगिरी केली आहे. विज्ञान, कला, वाणिज्‍य शाखेसह ह्युमॅनिटी या शाखांचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. (results of Class XII examination conducted by Central Board of Secondary Education declared online)

सकाळी बाराच्‍या सुमारास ऑनलाइन पद्धतीने निकाल जाही करण्यात आला. निकाल उपलब्‍ध होताच विद्यार्थ्यांची एकच जल्‍लोष करताना आनंदोत्‍सव साजरा केला. शहर परीसरातील विविध कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी या परीक्षेत यश मिळविताना बाजी मारली आहे.

नाशिक केंब्रिज स्कूलच्या विद्यार्थांनी मारली बाजी

नाशिक येथील केंब्रिज स्कूलच्या विद्यार्थ्यांनी बारावीच्‍या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. विज्ञान शाखेतून सृष्टी जाधव हिने ९१.२ टक्‍के मिळविताना प्रथम क्रमांक पटकावला. तर लोमाश सिंग (८६.८ टक्‍के) द्वितीय, शरण्या जोशी (८४.८ टक्‍के) तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली. वाणिज्‍य शाखेतून मधुर निकमने ९०.८३ टक्‍के गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला.

फातेमा सलीम सय्यद (९०.१६ टक्‍के) द्वितीय, सस्मित अहिरे (८८.१७ टक्‍के) तृतीय क्रमांक पटकावला. हुमॅनीटीज्‌ शाखेतून आरुषी यादव हिने ९०.३३ टक्क्यांसह प्रथम, प्रणय प्रसादने ७८.३३ टक्क्यांसह द्वितीय तर इशिता राजहंस ने ७७.६६ टक्क्यांसह तृतीय क्रमांक पटकावला. सर्व यशस्वी विद्यार्थांचे अभिनंदन शाळेचे विश्वस्त भारती रामचंद्रन, राहुल रामचंद्रन, प्राचार्य शुणमुग सुंदर, उपप्राचार्या विजया पाटील (रहाणे) यांनी केले. (latest marathi news)

CBSE 12th Result
CBSE SSC HSC Result : महाराष्ट्रातील दहावीच्या परीक्षेत ९३.६० टक्के, तर बारावीत ८७.९८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

दिल्‍ली पब्लिक स्‍कूलच्‍या धनद, तुलसीप्रिया, वृद्धीची बाजी

नाशिकः दिल्‍ली पब्लिक स्‍कूल येथील विद्यार्थ्यांनी यशाची परंपरा कायम राखताना बारावीच्‍या परीक्षेत यश संपादन केले. विज्ञान शाखेतून धनद गुप्ता (९६ टक्के) प्रथम, अक्षिता अग्रवाल (९५ टक्के) द्वितीय, तर अक्षा रौत, उदीत सक्सेना (९३ टक्‍के) यांनी संयुक्‍तरित्‍या तृतीय क्रमांक पटकावला आहे.

वाणिज्‍य शाखेतून तुलसीप्रिया नायडू (९८.८० टक्के) प्रथम, स्वानंदी वालझाडे (९५.२० टक्‍के) द्वितीय आणि हेमील रिझवानी (९४.२० टक्के) तृतीय क्रमांक पटकावला. ह्युमॅनिटी शाखेतून वृद्धी अग्रवाल (९६.४० टक्के) प्रथम, अनित्रा बसक (९४.६० टक्के) द्वितीय आणि विशाखा बोऱ्हा (९४.२० टक्के) तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली. संस्थेचे संचालक सिद्धार्थ राजघरिया यांच्‍यासह मुख्याध्यापक, शिक्षकांनी यशस्‍वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

CBSE 12th Result
CBSE Board Result : सीबीएसई दहावीच्‍या निकालात चमकले विद्यार्थी! शहरातील विविध शाळांचे उज्‍ज्‍वल यश

नाशिक रोड कॅम्‍प केंद्रीय विद्यालय

शहरातील पीएमश्री नाशिक रोड कॅम्प केंद्रीय विद्यालयाचा इयत्ता १२ वीचा निकाल ९८.५९ टक्‍के लागला. यामध्ये कला शाखेचा निकाल ९८.५९ टक्‍के लागला असून, वेदांत कडभाने (९६.४ टक्‍के) प्रथम, सोनाली यादव (९३.४ टक्‍के) द्वितीय, सृष्टी त्रिपाठी (९१.६० टक्‍के) तृतीय क्रमांक पटकावला आहे. विज्ञान शाखेचा निकाल शंभर टक्‍के लागला असून.

स्नेहा पोरजे (९०.२ टक्‍के) प्रथम, सेहवाग हा 86.8 टक्‍के गुणांसह द्वितीय, तर सम्यक ढेंगळेने 85.6 टक्‍के गुणांसह तृतीय क्रमांक पटकावला. वाणिज्य शाखेत पलाश केसवानी ९१.६ टक्क्यांसह प्रथम, श्रेया कुमारी (९० टक्‍के) द्वितीय, मेनका कुमारी आणि अजाज पिंजारी अजाज (८८.८ टक्‍के) संयुक्‍तरित्‍या तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले. विद्यार्थ्यांच्‍या यशाबद्दल प्राचार्य देवेंद्र कुमार ओलावत, उपप्राचार्या अंजु कृष्णानी, निमिषा सिंह आदींनी अभिनंदन केले.

CBSE 12th Result
Nashik PM Narendra Modi : शहर-जिल्ह्यात प्रतिबंधात्मक नोटीसा बजावण्याची शक्यता; मोदींच्या सभेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून सतर्कता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.