नाशिक : परतीच्या पावसाने नाशिक जिल्ह्यात शनिवारी (ता. १९) दाणादाण उडवून दिली. विजांचा प्रचंड कडकडाट, वेगवान वारे आणि पावसाळ्यातही नव्हता इतक्या वेगवान पावसाने सुमारे अडीच तास धुमाकूळ घातल्याने खरिपाची उरलीसुरली पिके मातीबरोबर डोळ्यांदेखत वाहून गेली. जिकडे-तिकडे पाणीच पाणी वाहत होते. शेतांना तलावाचे, तर महामार्गावर पाणी साचल्याने त्यांना नदीचे रूप आले होते. शहर-जिल्ह्यात शनिवारी पुन्हा जोरदार झालेल्या पावसाने ठिकठिकाणी नुकसान झाले. (Returning rain blow grain in district on Saturday)