Nashik News : सरकारला दुष्काळाचे गांभीर्य नसल्याचा आरोप ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुष्काळाचा आढावा घेण्यास सुरवात केली आहे. मुख्यमंत्री शिंदे मंगळवारी (ता. २८) ऑनलाइन नाशिक जिल्ह्याची सद्यःस्थिती जाणून घेणार आहेत. तसेच दुष्काळी भागात सरकारने जाहीर केलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी होत आहे का, याविषयीही माहिती घेणार आहेत. (Review of drought today by Chief Minister)
जिल्ह्यात यंदा भीषण दुष्काळ असल्यामुळे चारा व पाणी विकत घेण्याची वेळ ओढावली आहे. जिल्ह्यात चार महिन्यांत फक्त ६८.९२ टक्के पावसाची नोंद झाली. त्यामुळे पावसाची तब्बल ३१ टक्के तूट निर्माण झाल्यामुळे त्याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार आहे. आजही तो सहन करावा लागत आहे. उष्णतेच्या लाटेने सध्या संपूर्ण नाशिक जिल्हा तापला असताना दुसरीकडे जिल्ह्यातील धरणे तळ गाठण्याच्या मार्गावर आहेत.
आतापर्यंत सहा धरणे कोरडीठाक झाली असून, अन्य सहा धरणेही तळ गाठण्याच्या स्थितीत आहेत. मेअखेर जिल्ह्यातील धरणसाठा १६.३७ टक्क्यांवर आला आहे. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात २८ टक्के साठा आहे. पावसाला विलंब झाल्यास टंचाईचे संकट भयावह स्वरूप धारण करण्याची भीती व्यक्त होत आहे.
जिल्ह्यातील धरणांमध्ये सध्या दहा हजार ७४७ दशलक्ष घनफूट साठा आहे. गेल्या वर्षी हे प्रमाण दुप्पट म्हणजे २० हजार १२२ दशलक्ष घनफूट होते. सद्यःस्थितीत ओझरखेड, पुणेगाव, तिसगाव, भोजापूर, माणिकपुंज, नाग्या-साक्या ही धरणे कधीच कोरडीठाक झाली आहेत. भावली धरणात जेमतेम पाणी आहे. (latest marathi news)
आळंदी (२.५७ टक्के), वाघाड (३.७४), वालदेवी (६.७१), केळझर (१.०५), चणकापूर धरणात (४.८६) साठा आहे. ही सहा धरणे कधीही रिक्त होतील, अशी स्थिती आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा धरणांमध्ये निम्मा साठा आहे. पाणीटंचाई बरोबरच आठ तालुक्यांमध्ये जूनअखेर तर एका तालुक्यात मेअखेर पुरेल इतकाच चारा शिल्लक आहेत.
चारा छावण्या सुरू करण्यासारखी परिस्थिती नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. परंतु, शेतकऱ्यांना वैयक्तिक पातळीवर चाऱ्याची व्यवस्था करावी लागत आहे. संपूर्ण दुष्काळाचा आढावा घेऊन मुख्यमंत्री शिंदे काय उपाययोजना करण्याचे आदेश देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या आठ उपाययोजना महत्त्वाच्या
- दुष्काळी भागात जमीन महसुलात सूट
- पीककर्जाचे पुनर्गठन
- कर्जवसुलीस स्थगिती
- कृषिपंपाच्या चालू वीजबिलात ३३.५ टक्के सूट
- शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफ
- रोजगार हमी योजनेंतर्गत कामाच्या निकषात शिथिलता
- टँकरने पिण्याचे पाणी पुरवणे
- शेतीपंपाची वीजजोडणी खंडित न करणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.