Nashik News : सुटीला रिव्‍हॉल्व्हर नेली घरी, अंमलदार सक्‍तीने निवृत्त! पोलिस आयुक्‍त कर्णिक यांच्‍याकडून कठोर कारवाई

Nashik News : साप्ताहिक सुटीच्‍या दिवशी परवानगी न घेता आपली ‘सर्व्हिस रिव्‍हॉल्व्हर’ घरी नेणाऱ्या अंमलदारावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे
police pistol
police pistolesakal
Updated on

Nashik News : साप्ताहिक सुटीच्‍या दिवशी परवानगी न घेता आपली ‘सर्व्हिस रिव्‍हॉल्व्हर’ घरी नेणाऱ्या अंमलदारावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. पोलिस आयुक्‍त संदीप कर्णिक यांनी या प्रकरणाच्‍या विभागीय चौकशीच्‍या आधारे पोलिस नाईक संजय अंबादास भोये यांना सक्‍तीची निवृत्ती दिली आहे. (Nashik Revolver taken home on holiday police forced to retire)

संजय भोये हे उपनगर पोलिस ठाणे येथे कार्यरत असताना गेल्‍या २१ जून २०१९ ला साप्ताहिक सुटी होती. त्‍यामुळे २० जूनला ड्यूटी संपल्‍यावर त्‍यांच्‍याकडे असलेली सर्व्हिस रिव्‍हॉल्व्हर ठाण्यातील कारकून यांच्‍याकडे जमा करणे आवश्‍यक होते. मात्र त्‍यांनी तसे न करता रिव्‍हॉल्व्हर स्‍वतःसोबत घरी नेली.

याची गंभीर दखल घेताना विनापरवानगी शासकीय पिस्तूल बाळगल्‍याने महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ चा भंग केल्‍याचा ठपका ठेवण्यात आला. याप्रकरणी श्री. भोये यांची विभागीय चौकशी सुरू होती. चौकशीची प्रक्रिया नुकतीच पूर्ण झाली असून, त्यांना नोटीस बजाविण्यात आली.

पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी भोये यांचे म्हणणे ऐकून घेतले. त्यानंतर त्‍यांना ‘सक्तीने निवृत्त’ होण्याची शिक्षा सुनावली. दरम्‍यान, या निर्णयाबाबत त्‍यांना साठ दिवसांच्‍या आत महासंचालक कार्यालयाकडे दाद मागता येणार आहे. (Latest Marathi News)

police pistol
Nashik Police : रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक ‘ॲक्शन’! निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त आक्रमक

हुज्‍जत घालणाऱ्या अंमलदाराची वेतनवाढ रोखली

अन्‍य एका प्रकरणात मद्यधुंद अवस्‍थेत पोलिस निरीक्षकांसोबत हुज्‍जत घालत अपशब्‍द वापरल्‍याप्रकरणी अंमलदाराची वेतनवाढ रोखण्याची शिक्षा सुनावली आहे. अशोक वामन आघाव असे संबंधित अंमलदाराचे नाव आहे. या आदेशानुसार त्‍यांनी एक वर्षासाठी वेतनवाढ रोखली जाणार आहे. गेल्‍या १६ नोव्हेंबर २०२३ ला रात्री ते सिन्नर फाटा परिसरात रस्त्याच्या उलट्या दिशेने कार चालवत होते. नाकाबंदी असल्‍याने पोलिसांनी त्‍यांना अडविले.

या वेळी नाशिक रोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक यांच्‍यासोबत वाद घालताना अपशब्‍द वापरल्‍याची तक्रार होती. यासंदर्भात संशयित आघावविरोधात गुन्हादेखील नोंदविला होता. यासंदर्भात खातेअंतर्गत चौकशीनंतर वेतनवाढ रोखण्याचा निर्णय दिला असून, त्‍यांना निर्णयाविरोधात महासंचालक कार्यालयाकडे दाद मागता येईल.

police pistol
Nashik Police : शहरातील अंबड, भद्रकालीत 40 संवेदनशिल बुथवर असेल ‘कॅमेऱ्या'ची नजर! पोलिसांकडून ठोस उपाययोजना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.