Nashik News : भातशेती रुतली मजुरीच्या चिखलात; स्थानिक मजूर उद्योग कारखान्यात कार्यरत

Nashik News : इगतपुरी तालुक्यात पावसाने गेल्या दहा पंधरा दिवसांपासून सर्वत्र समाधानकारक हजेरी लावल्यानंतर तालुक्यातील सर्वच गाव-वाड्या-पाड्यांमध्ये भात लागवडीच्या (आवणी) कामांना वेग आला आहे.
The ongoing rush of paddy and wheat cultivation.
The ongoing rush of paddy and wheat cultivation.esakal
Updated on

इगतपुरी : इगतपुरी तालुक्यात पावसाने गेल्या दहा पंधरा दिवसांपासून सर्वत्र समाधानकारक हजेरी लावल्यानंतर तालुक्यातील सर्वच गाव-वाड्या-पाड्यांमध्ये भात लागवडीच्या (आवणी) कामांना वेग आला आहे. भात लावणी यंत्रे महागडी असल्याने ती शेतकऱ्यांना परवडत नाहीत. स्थानिक मजूर उद्योग कारखान्यात कार्यरत असल्याने खर्डी, शहापूर कसारा. (Rice Farming)

आसनगाव, उंबरमाळी, जव्हार, मोखाडा व नाशिक या ठिकाणांहून मजूर आणावे लागत आहेत. तालुक्यात १२४ गावे आणि १५० हून अधिक वाडे-पाडे आहेत. तालुक्यात दर वर्षी ३० हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रात भाताची लागवड केली जाते. येथील शेतकरी सुरती, गुजरात ११, गुजरात थाळी, रत्ना, सुवर्णा, कर्जत, इंद्रायणी, सह्याद्री, सोनम हाळी.

आर २४, जीओ, एक हजार आठ, राधा फुले आणि मसुरी आदी भाताच्या वाणांची लागवड करून उत्पन्न घेतात. येथील इंद्रायणी भाताचा वाण राज्यभर प्रसिद्ध आहे. काही वर्षांपासून या भागातील मजूर शहरी भागातील कारखान्यात काम करतात. त्यामुळे पावसाळ्यात मिळणारे मजूर गेल्या अनेक वर्षांपासून मिळत नसल्याने भात पिकाची लागवड कशी करायची, असा प्रश्न येथील शेतकऱ्यांना भेडसावत आहे. (latest marathi news)

The ongoing rush of paddy and wheat cultivation.
Nashik Police : आयुक्तांचा दणका, प्रभारींच्या उचलबांगडी; काही थेट कंट्रोल रूममध्ये

मजुरीत वाढ

ऐनहंगामात मजुरांची टंचाई भासत असून, रोज ३०० ते ३५० रुपये आणि जेवणाचा खर्च द्यावा लागतो. निसर्गाच्या लहरीपणावर अवलंबून असलेली भातशेती, मजुरांचे वाढलेले दर, खताचे व यांत्रिक उपकरणाचे वाढलेले दर यामुळे भातशेती परवडत नसल्याने शेतकऱ्यांनी पेरभात शेतीला पसंती दिली आहे.

या वर्षी ३० ते ४० टक्के पेरभात शेती केली असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. शेतकरी आता मल्चिंग शेती, एस.आर.टी.एस.आर.आय., डम सिडर, बावचा, वापे पद्धतीची भातशेती करू लागला आहे. तालुक्यात एस.आर.टी. भातशेती सुमारे ५० एकर, तर मल्चिंग सहा ते सात एकर क्षेत्रात केली असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.

The ongoing rush of paddy and wheat cultivation.
Nashik Water Shortage : दीड महिना उलटूनही कसमादेतील धरणे कोरडीठाक! पाणलोट क्षेत्रात पाऊस रुसला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.