नाशिक : केंद्र सरकारच्या राष्ट्रीय हवा स्वच्छता कार्यक्रमांतर्गत प्राप्त झालेल्या करोडो रुपये निधीतून वायुप्रदूषण रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या. असे असली तरीही नाशिक शहरातील वायू गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) घसरला असून जगभरातील वायू प्रदूषित शहरांच्या यादीत नाशिक २७४ व्या क्रमांकावर पोचले आहे. तर देशात नाशिक शहराचा हवेचा गुणवत्ता निर्देशांक ११३ नोंदविला गेला. शहरात मोठ्या प्रमाणात रस्त्यांवर खड्डे पडले असून पावसाळ्यानंतर स्वच्छता न झाल्याने धुळीचे प्रमाण वाढल्याने हवा गुणवत्ता निर्देशांक वाढल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे.