SAKAL Exclusive : जिल्ह्यात 49 गावांत दरड कोसळण्याचा धोका! 3 ठिकाणीच उपाययोजना

Nashik News : जिल्ह्यातील ४९ गावांत दरड कोसळणे, पावसामुळे भूस्खलन होण्याचा प्रस्ताव जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने जिओलॉजिकल सर्वेक्षणासाठी पाठवला आहे.
Landslides (file photo)
Landslides (file photo)esakal
Updated on

Nashik News : पावसाळ्यात दरड कोसळून ‘माळीण’सारखी घटना घडू नये म्हणून जिल्हा प्रशासनाने संभाव्य धोकादायक गावांची यादी तयार केली आहे. जिल्ह्यातील ४९ गावांत दरड कोसळणे, पावसामुळे भूस्खलन होण्याचा प्रस्ताव जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने जिओलॉजिकल सर्वेक्षणासाठी पाठवला आहे. (Risk of landslides in 49 villages in district Solution in 3 places)

विशेष म्हणजे त्यातील अंजनेरी, सुरगाणा व पिंपळगाव भटाटा या ठिकाणी उपाययोजना करण्यायोग्य परिस्थिती असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. हवामान विभागाने यंदा मुसळधारेचा अंदाज वर्तविल्यामुळे मॉन्सूनपूर्व तयारीला वेग आल्याचे दिसते. दरड कोसळून होणारे नुकसान व भूस्खलन होऊन त्याखाली घरे गाडली जाणार नाहीत, याचा आढावा प्रशासनाने घेतला आहे.

तालुका व गावपातळीवरून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाला प्राप्त झालेल्या माहितीनुसार त्र्यंबकेश्‍वर, इगतपुरी, पेठ, दिंडोरी, कळवण, नाशिक व सिन्नर येथे एकूण ४९ धोकादायक ठिकाणे असल्याचे सांगण्यात आले. त्यातील बहुतांश ठिकाणी तर लोकवस्तीच नाही. त्यामुळे येथे उपाययोजना करण्याची आवश्‍यकता नसल्याचा अंदाज सार्वजनिक बांधकाम विभागाने वर्तवला आहे.

काही ठिकाणे ही वन विभागाच्या अखत्यारित येत असल्यामुळे आपत्ती व्यवस्थापन विभागाने त्या ठिकाणांचा विषय संबंधित तहसीलदार व वन विभागाकडे सुपूर्द केला आहे. या विभागाने गेल्या वर्षी ४९ गावांचा, तर चालू वर्षी कानडवाडी, तळेगाव व पिंपळगाव भटाटा (सर्व ता. इगतपुरी), सुरगाणा शहर व अंजनेरी (ता. त्र्यंबकेश्‍वर) या पाच ठिकाणचे प्रस्ताव जिऑलॉजिकल सर्वेक्षणासाठी पाठवले. (latest marathi news)

Landslides (file photo)
Nashik News : अंधश्रध्देविरोधात पंचवटीत प्रबोधन मोहीम; भोंदूगिरी शून्यावर पोलिस - अंनिसचा उपक्रम

त्यापैकी कानडवाडी व तळेगाववगळता उर्वरित तीन ठिकाणी भूस्खलन होणार नाही, यादृष्टीने संरक्षण भिंत, जाळी बसवण्याच्या उपाययोजना प्रस्तावित आहेत. विशेष बाब म्हणून सप्तशृंगगडाच्या सुरक्षेसाठी ९१ कोटी २० लाखांचे तीन प्रस्ताव राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे पाठविण्यात आले आहेत.

याव्यतिरिक्त जिल्ह्यातील संरचनात्मक स्वरूपाच्या ४६ कामांसाठी १६३ कोटी २५ लाखांचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात आला आहे. बिगर संरचनात्मक स्वरूपाचा तीन कोटी दहा लाखांच्या चार कामांचा प्रस्ताव गेल्या महिन्यात (मे २०२४) प्रस्तावित करण्यात आला आहे.

आपत्ती व्यवस्थापन विभागाने मार्च व मे २०२४ या कालावधीत २६० कोटी ६५ लाखांची विविध स्वरूपाची कामे प्रस्तावित केली आहेत. प्राप्त झालेले प्रस्ताव राज्य सरकार त्यांच्या तांत्रिक समितीकडे पाठतात. कामांची उपयुक्तता बघूनच त्यांना अंतिम मान्यता मिळते आणि निधी मंजूर केला जातो.

सप्तशृंगगडासाठी विशेष निधीची मागणी

साडेतीन शक्तिपीठांमध्ये समाविष्ट असलेल्या वणीच्या सप्तशृंगगडावर पावसाळ्यात दरड कोसळण्याच्या घटना घडतात. त्यातून रस्ता बंद होणे, वाहतूक कोंडी होते. हा संभाव्य धोका टाळण्यासाठी विशेष बाब म्हणून म्हणून राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे तीन कामांसाठी ९१ कोटी २० लाखांची मागणी केली आहे.

Landslides (file photo)
Nashik Crime News : तडीपार गुंडाकडून महापालिकेच्या कत्तलखान्यातच गोवंशाची कत्तल!

तालुकानिहाय गावे

त्र्यंबकेश्‍वर : सुपलीची वाडी, गंगाद्वारवाडी, जांभ्याची वाडी, विनायक खिंडीची वाडी, पठराची वाडी, अंजनेरी

इगतपुरी : कावनाई किल्ला, पिंपळगाव भटाटा

पेठ : पिंपळपाडा, कळमपाडा, गोळसपाडा, जामले, हरणगाव, अंबापूर

दिंडोरी : रडतोंडी, पिंप्रज, आवंतवअडी, चंडीकापूर, सुर्वेगड

कळवण : मांगलीदार, ततानीपाडा, जामले, कोसुर्डे, भाकुर्डे, करंभेळ, देसगांव, तिर्हळ, गांडूळ मोकपाडा, आमदर, दिगमे, खर्डेदिगर, उंबरगव्हाण, चोळीचामाळ, हनुमंत माळ, महाल, पायरपाडा, काठरे दिगर, बोरदैवत, देरेगाव, वणी, मोहनदरी, नांदुरी, सप्तशृंगगड, मेहदर, मुळाणे वणी, वडाळे, पिंपरी मार्कड, कातळगाव, पाळे पिंप्री

नाशिक : पिंपळद

सिन्नर : औंढेगाव

उपाययोजनांचा प्रस्ताव

सुरगाणा- संरक्षक भिंत उभारणे : दोन कोटी रुपये

अंजनेरी- संरक्षक भिंत बांधणे : एक कोटी रुपये

पिंपळगाव भटाटा- संरक्षक भिंत बांधणे- दहा लाख रुपये

सप्तशृंगगडाचा विशेष प्रस्ताव

- गडाच्या मागील बाजूचे भूस्खलन रोखणे- ६० कोटी २० लाख रुपये

- नांदूर-अभोणा-कनाशी-आलियाबाद रोड- ३० कोटी रुपये

- दरेगाव वणी ते बिलवाडी घाट- एक कोटी रुपये

एकूण- ९१ कोटी २० लाख रुपयांचा प्रस्ताव

Landslides (file photo)
Nashik News : कोट्यवधी खर्चून उभारलेले नाट्यगृह बंदच! वस्तू वापराअभावी खराब होण्याची भीती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.