Nashik News : नाशिक रोडला आरटीओचे कार्यालय होण्याचा मार्ग मोकळा

RTO motor vehicle inspector Kishore Pawar and officers while inspecting the place on Artillery Center Road.
RTO motor vehicle inspector Kishore Pawar and officers while inspecting the place on Artillery Center Road.esakal
Updated on

नाशिक रोड : राज्य परिवहन मंडळाच्या (एसटी) नाशिक रोड येथील आर्टिलरी सेंटर रोडवरील जागा प्रादेशिक परिवहन विभागाला (आरटीओ) हस्तांतरित करण्याबाबत खासदार हेमंत गोडसे व माजी नगरसेविका ज्योती खोले यांनी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला होता.

त्यानंतर गुरुवारी आरटीओच्या अधिकाऱ्यांनी मैदानाची परिसराची पाहणी केली. दरम्यान, नाशिक रोडला आरटीओचे विभागीय कार्यालय होण्याचा मार्ग मोकळा होणार शक्यता आहे. (Nashik Road cleared for RTO office Nashik News)

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

RTO motor vehicle inspector Kishore Pawar and officers while inspecting the place on Artillery Center Road.
Pimpalgaon Market Committee Election : माघारी अंतीच चित्र स्पष्ट होणार! पॅनलची घोषणा अद्यापही नाही

आर्टिलरी सेंटर रोड येथे पडीक असलेली साडेपाच एकर जागा सिंहस्थ काळात एसटी विभागाने डेपोसाठी ताब्यात घेतली होती. कुंभमेळ्यात या डेपोतून एसटी बाहेर काढताना वाहतूक कोंडी होत होती. तसेच अपघाताचीही भीती होती.

त्यामुळे प्राथमिक विकास कामे करूनही ही डेपोची जागा वापरात नव्हती. त्यामुळे ती आरटीओला हस्तांतरित करून त्या ठिकाणी आरटीओचे नाशिक रोड विभागीय कार्यालय निर्माण करण्याची मागणी होती. आरटीओचे मोटर वाहन निरीक्षक किशोर पवार, देवळाली गाव शिवारातील तलाठी खैरनार आदींनी एसटी विभागाच्या ताब्यात असलेल्या जागेची पाहणी केली, छायाचित्रण केले.

तलाठी खैरनार यांनी जागेचे कागदपत्र सादर केल्यानंतर त्याची शहानिशा करण्यात आली. याबाबत लवकरच मुख्यमंत्री कार्यालयाला प्रस्ताव सादर करणार असल्याबाबत निरीक्षक पवार यांनी सांगितले. माजी नगरसेविका ज्योती खोले, शिवसैनिक श्यामराव खोले आदींसह प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

RTO motor vehicle inspector Kishore Pawar and officers while inspecting the place on Artillery Center Road.
Yeola Market Committee Election : येवल्यात शिवसेना लढणार निवडणूक! पालवे, शेळके यांची माहिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.