Nashik Currency Note Press : भारतीय रिझर्व्ह बँकेने दोन हजाराची नोट बंद करण्याची घोषणा केल्यानंतर भारताला चलनी नोटांचा पुरवठा करणारी नाशिक रोड येथील करन्सी नोट प्रेसला नवीन नोट छपाईचे काम मिळणार असल्यामुळे प्रेसच्या महसुलात वाढ होणार आहे.
दोन हजाराची नोट बंद झाल्यामुळे दहापासून पाचशेपर्यंतच्या नोटांना बाजारात जास्त मागणी येणार आहे. पर्यायाने नोट छपाईचे काम वाढणार आहे. डिजिटल करन्सी युगात प्रेसचे अस्तित्व टिकून राहिल्यामुळे कामगार ही इष्टापत्ती समजत आहे. (nashik road Currency Note Press will get new job nashik news)
दोन हजाराची नोट बंद होणार या बातमीने भारतभर खळबळ उडाली होती. मात्र या नोटा बदलून देण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी निश्चित करण्यात आलेला आहे. दोन हजाराची ही नोट बदलीने नाशिक रोड प्रेसला रिझर्व्ह बँकेकडून जादा काम मिळून प्रेस कामगाराचा फायदाच होणार आहे.
देशाच्या महसुलात छप्पर फाडके वाढ होणार असून कामगारांना नोटा छपाईसाठी नवे आव्हान प्राप्त होणार आहे. बाजारात एक हजाराची नोट येणार याची चर्चा सध्या जोरात सुरू आहे. मात्र, केंद्र सरकार चलनी नोटांना नवा पर्याय काढणार असल्याचे बोलले जात आहे.
रिझर्व्ह बँक नाशिक रोड आणि देवास प्रेसकडून नोटा छापून घेते. मात्र बँकेने सालबोनी (पश्चिम बंगाल) आणि म्हैसूर (कर्नाटक) येथे स्वतःची नोट प्रेस सुरू करून नाशिक रोड प्रेसशी स्पर्धा सुरु केली.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
दोन हजाराच्या नोटा बँकेच्या स्वतःच्या प्रेसमध्ये छापण्यात येत होत्या. नाशिक रोड प्रेसला पाच रुपयापासून पाचशेपर्यंतच्या नोटा छपाईचे काम देण्यात आले आहे. हे काम हजार कोटींचे नव्हे तर अब्जावधींचे आहे.
नाशिक रोड प्रेसला या वर्षी ५ हजार दोनशे दशलक्ष नोटा छापण्याचे काम मिळाले आहे. याशिवाय नेपाळच्या तीनशे कोटी नोटा छपाईचे काम मिळाले. असून अन्य देशांच्या नोटा छपाईला मिळाव्यात यासाठी प्रेस प्रशासन प्रयत्न करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.