Nashik News : राजमाता जिजाऊ मार्गावरील पथदीप बंद!

Nashik News : प्रभाग १मधील नव्याने विकसित होत असलेल्या राजमाता जिजाऊ मार्गावर नागरीकांच्या मागणीनंतर नवीन पथदीप बसविण्यात आले आहे. मात्र, सद्यस्थितीत ते बंद आहेत.
Street lamp off on Rajmata Jijau road
Street lamp off on Rajmata Jijau roadesakal
Updated on

Nashik News : प्रभाग १मधील नव्याने विकसित होत असलेल्या राजमाता जिजाऊ मार्गावर नागरीकांच्या मागणीनंतर नवीन पथदीप बसविण्यात आले आहे. मात्र, सद्यस्थितीत ते बंद आहेत. काही दिवसांपूर्वी या भागात खून झाल्याची घटना घडली होती. यामुळे परिसरातील राहणाऱ्या नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने पथदीप लावण्याची मागणी स्थानिक माजी नगरसेवक यांच्याकडे केली होती. (Street lamp off on Rajmata Jijau road)

त्यानूसार पथदीप बसविण्यात आले. मात्र, पथदीप बंद असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. सदर पथदीप तात्काळ सुरू करण्यात यावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. दिंडोरी रोडवरील रिलायन्स पेट्रोलपंपासमोर परिसर कलानगर, निसर्गनगर, शिवगंगानगरकडून रामेश्वरनगर त्रिफुलीकडे जातो. रामेश्वरनगर त्रिफुलीपासून नव्याने तयार झालेला रिंगरोड म्हणजे राजमाता जिजाऊ मार्ग होय.

या मार्गावर उजवी बाजूकडे नवनवीन बांधकाम सुरू आहेत. तसेच या मार्गावर मोराडे वस्ती, पोटींदे वस्ती, सागर वस्ती, घोलप वस्ती, आहे. तसेच हा मार्ग म्हसरूळ आडगाव लिंक रोडला जोडला जातो. या मार्गावर पहाटे पाचपासून सकाळी साडेसात ते आठपर्यंत मॉर्निंग वॉक व सायंकाळी पाचपासून रात्री आठपर्यंत इव्हिनिंग वॉकसाठी पोकार नागरिक जात असतात.

या मार्गावर रामेश्वरनगरपासून साई सिद्धी रो- हाऊसपर्यंत जुने तीन पथदीप आहेत, तेथून पुढे या राजमाता जिजाऊ मार्गावर पोटिंदे वस्तीपर्यंत २२ नवीन पथदीप बसविण्यात आले आहेत, यातील जुने तीन पथदीप सुरू आहेत. (latest marathi news)

Street lamp off on Rajmata Jijau road
Nashik Police : प्रलंबित तक्रारींचा तातडीने निपटारा करा! ‘झिरो पेंडन्सी’साठी आयुक्तांनी दिले आदेश

मात्र नवीन २२ पथदीप बंद आहेत. तसेच जागन्नाथ लॉन्सकडून पुन्हा परतीच्या मार्गावर सागर वस्तीच्या अलीकडे १२ पथदीप आहेत, यातील दोन पथदीप सुरू आहेत. बाकी बंद आहेत. या मार्गावर नित्य वॉक करणाऱ्या नागरिकांनी सदर नवीन बसविलेले पथदीप तात्काळ सुरू करावे, अशी मागणी केली आहेत.

"नागरिकांच्या मागणीनुसार या राजमाता मार्गावर पथदीप बसविण्यात आले आहे. सुरुवातीला पथदीपचे पोल बसविण्यात आले होते. याबाबत पाठपुरावा करून त्यावर आता दीपदेखील बसविण्यात आले आहे. ते लवकरात लवकर सुरू होतील, त्यासाठी विद्युत विभागाशी बोलणेदेखील केले आहे." - गणेश गिते, माजी स्थायी समिती सभापती

Street lamp off on Rajmata Jijau road
Nashik News : 84 हजार मुलांची सुटका; देशभरात रेल्वे सुरक्षा दलाकडून संभाव्य धोक्यापासून मुला-मुलींचे संरक्षण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.