सातपूर : गणेशोत्सवात गणपती विसर्जनाच्या दिवशी मंडळांकडून नियमांचे पालन न करता लाऊडस्पीकर, डीजे, ढोल, बॅन्जो आदींचा चांगलाच दणदणाट झाला. त्यामुळे नाशिकच्या ध्वनीप्रदूषणात यंदाही वाढ झाल्याचे प्रदुषण नियत्रंण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी लिबांजी भड यांनी सांगितले. यात नाशिक रोडला निघालेल्या मिरवणुकीत डिजेचा आवाज ९४ डिसेबलपर्यंत आवाजाची नोंद करण्यात आली. (Loudest DJ on Nashik Road during Ganeshotsav)
गणेशोत्सव आणि विसर्जन मिरवणुकीत डिजेचा वापर न करण्याचे आवाहन व वापरल्यास त्याची मर्यादा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पोलिस आयुक्त यांच्याकडून गणेशमंडळांना ठरवून देण्यात आली होती. त्यासंदर्भात झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी तसे आश्वासन देखील दिले होते.
मात्र, नाशिक रोड येथे निघालेल्या विसर्जन मिरवणुकीत ठरवून दिलेल्या डेसिबलचे मंडळांकडून उल्लंघन झाल्याचे समोर आले आहे. नाशिक रोड मध्ये आठ वाजेला ९४ डेसिबलचे ध्वनीप्रदूषण नोंदवले गेले. यावेळी ध्वनी प्रदूषणात वाढ झाली. गतवर्षीच्या तुलनेत नाशिकमध्ये यंदा गणपती आणि ईदच्या मिरवणुकीदरम्यान ध्वनिप्रदूषणात किंचित घट झाली आहे. पण ते मर्यादेपेक्षा जास्त राहिले आहे.
गणपती उत्सव साजरा करणाऱ्या मंडळांनी आवाजाची पातळी कमी केली होती. परंतु मंडपात ध्वनीपातळीत वाढ झाली तसेच, मध्यरात्रीनंतर जेव्हा स्पीकर वापरण्यास परवानगी नव्हती, अशा वेळी मंडपात संगीत, स्वागत संदेश, धार्मिक घोषणा मोठ्या आवाजात दिल्या जात होत्या. याचाही परिणाम पाहायला मिळाले आहे. सातपुरमध्ये ७९ डिसेबल नोंद करण्यात आली आहे. नाशिक रोड नंतर अशोक स्तंभ ते पंचवटी परिसरात ८९ डिसेबलची नोंद करण्यात आली आहे.
स्थळ - जास्ती - मध्यम- सरासरी
नाशिक रोड- ९४ - ८१- ८९
पंचवटी -८९ - ८० - ८५.७
सिव्हील - ८५ - ६९ - ७९,२
सिडको- ८३ - ७० - ७७,७
सातपूर - ७९ - ६३ - ७३.७
स्थळ - दिवस - रात्री
औद्योगिक - ७५ - ७०
वाणिज्य - ६५ - ५५
निवासी - ५५ - ४५
शांतता झोन - ५० - ४०
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.