Nashik Development : कृषी, ऑटोमोबाईल, फार्माच्या आधारे विकास आराखड्याचा ‘रोड मॅप’! गुंतवणुकीची क्षेत्रे निश्‍चित

Nashik News : देशाला परकीय चलन मिळवून देणाऱ्या द्राक्ष, कांद्यासह कृषी प्रक्रिया उद्योग, फार्मा, ऑटोमोबाईल या क्षेत्रांत गुंतवणुकीचा पंचवार्षिक ‘रोड मॅप’ जिल्हा नियोजन समितीने तयार केला आहे
Agriculture, Automobile & Pharma Sector
Agriculture, Automobile & Pharma Sectoresakal
Updated on

नाशिक : देशाला परकीय चलन मिळवून देणाऱ्या द्राक्ष, कांद्यासह कृषी प्रक्रिया उद्योग, फार्मा, ऑटोमोबाईल या क्षेत्रांत गुंतवणुकीचा पंचवार्षिक ‘रोड मॅप’ जिल्हा नियोजन समितीने तयार केला आहे. डिफेन्स व ॲग्री इनोव्हेशन हबच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्याचे सकल राष्ट्रीय उत्पन्न पुढील पाच वर्षांत दोन लाख ७५ हजार कोटींपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट जिल्हा प्रशासनाने ठेवले आहे. यातून विविध क्षेत्रात रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. (Nashik Road Map of development marathi news)

जिल्ह्याचा विकास आराखडा राज्य सरकारला नुकताच सादर झाला. यात सार्वजनिक खासगी भागीदारीतून (पीपीपी) गुंतवणूक करण्याचे नियोजन आहे. रिलायन्स लाइफ सायन्सेस प्रकल्पाच्या माध्यमातून जिल्ह्यात गुंतवणूक सुरु झाली आहे. त्याला पूरक असणारे उद्योग भविष्यात निर्माण होतील.

तसेच हिंदुस्तान एरॉनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) मध्ये यापुढे प्रवासी विमानांची दुरुस्ती होणार असल्याने त्याला पूरक व्यवसायांची वृद्धी अपेक्षित आहे. पुण्याच्या धर्तीवर नाशिकमध्ये ऑटो क्लस्टर उभारणे, रिसर्च आणि डेव्हलपमेंट सेंटर स्थापन होऊ शकते. नाशिकमध्ये फळे, भाजीपाला सर्वाधिक उत्पादित होतो.

त्याचे योग्यप्रकारे नियोजन करून प्रक्रिया उद्योग उभे राहू शकतात. कृषी आधारित पर्यटन, वाइन टुरिझमचा योग्यप्रकारे प्रसार झाल्यास यातून जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळेल. याशिवाय आयटी इंडस्ट्री, सातत्यपूर्ण विमानसेवा हा नाशिकच्या विकासाचा मानबिंदू ठरु शकतो.

विशेष म्हणजे नाशिकला धार्मिकदृष्ट्या खूप महत्त्व आहे. भक्ती, मुक्ती व शक्ती अर्थात सप्तशृंगी गड, त्र्यंबकेश्‍वर व शिर्डी हा सुवर्ण त्रिकोण साकारणार आहे. कृषी, पर्यटन, फळ प्रक्रिया उद्योगातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याचे नियोजन आहे. तर उद्योगातून रोजगारवृद्धी होईल.

हॉटेल व्यवसायाला चालना देणाऱ्या या सर्व गोष्टींचा पंचवार्षिक रोड मॅप तयार झाल्यामुळे भविष्यात याच दिशेने काम करावे लागेल. नदीजोड प्रकल्पांच्या माध्यमातून दुष्काळग्रस्त तालुक्यांना पाणी देण्याचे नियोजन ही विकास आराखड्यातील महत्त्वाची बाब समजली जाते. या सर्व गोष्टींसाठी भविष्यात कशा पद्धतीने गुंतवणूक होते, हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे. (Latest Marathi News)

Agriculture, Automobile & Pharma Sector
Nashik IT Park: समाजमन - ‘आयटी पार्क’मुळे विकासाचा वारू दौडणार

वन स्टॉप सोल्यूशन्सची गरज

एक खिडकी योजनेतून सर्व परवाने देण्याची गरज यापूर्वी अनेकदा व्यक्त झाली. परंतु, प्रत्यक्ष अंमलबजावणी कुठेही झालेली दिसत नाही. जिल्हा विकास आराखड्यात याच गोष्टीचा अंतर्भाव झाल्याने त्याची अंमलबजावणी विविध विभागांना करावी लागेल, असे दिसते.

या गोष्टींची आवश्‍यकता

-फळ प्रक्रिया उद्योगांसह कोल्ड स्टोरेजची कमतरता

-द्राक्ष निर्यातीला अधिक चालना देण्याची गरज

-कांदा निर्यातीविषयी सातत्याने बदलणारे निर्णय

-पैठणी व सिल्कचा अधिक प्रचार आणि प्रसिद्धी व्हावी

-सातत्यपूर्ण विमानसेवा मिळावी

-धार्मिक पर्यटनाच्या पलिकडे पर्यटकांचा विचार व्हावा

Agriculture, Automobile & Pharma Sector
Ramadan Eid Festival : मुस्लिम बांधवांच्या चंद्रदर्शनाकडे नजरा; दर्शन घडल्यास रमजान पर्व सुरू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.