Nashik Road MSRTC Depot: क्षमता 20, बसच्या फेऱ्या 900! नियोजनकर्ते जागे होणार कधी? स्थानकाचीही दुरवस्था

Latest Nashik News : कालौघात हा ताण इतका वाढतो आहे की, नियोजनकर्ते करतात काय ? पुढील २५ ते ३० वर्षाचा वाढीव ताण लक्षात घेता सगळ्या वाहातूक सेवा एका छताखाली देण्यासाठी वाढीव जागेचा विचार होणार कधी ? हा प्रश्न आहे.
vehicles parked in the bus station premises
vehicles parked in the bus station premises esakal
Updated on

Nashik Road MSRTC Depot : नाशिक रोड बसस्थानकाची क्षमता २० बस थांबतील एवढी आहे. मात्र रोज परिवहन सेवेच्या आंतरजिल्हा आणि सिटी लिंकच्या शहरार्तंगत बसच्या ९०० फेऱ्या होतात. रेल्वे, परिवहन, सिटी लिंकसह स्थानीक रिक्षा,टॅक्सीच्या गर्दीत सामान्य प्रवासी आणि त्यांची वाहातूक करणारी बस यांनाच जागा नसते.

कालौघात हा ताण इतका वाढतो आहे की, नियोजनकर्ते करतात काय ? पुढील २५ ते ३० वर्षाचा वाढीव ताण लक्षात घेता सगळ्या वाहातूक सेवा एका छताखाली देण्यासाठी वाढीव जागेचा विचार होणार कधी ? हा प्रश्न आहे. (Nashik Road MSRTC Depot bad condition)

नाशिक रोड स्थानकाला लागूनच रेल्वेस्थानक आहे. रोज ९६ च्या आसपास रेल्वेगाड्या धावणाऱ्या स्थानकातून २० हजाराहून आधीक प्रवासी रेल्वेतून उतरल्यानंतर बसस्थानकात येतात. रेल्वे गाड्यांना जोडूनच शहराची सिटी लिंक वाहातूक सेवा आहे. साधारण १०० बसच्या दिवसभरात त्यांच्या ५००च्या आसपास फेऱ्या होतात.

याशिवाय परिवहन महामंडळाचे नाशिक आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारे प्रमुख स्थानक असल्याने ३५० बसची येथूनच ये जा होत असते. राज्यातील विविध भागासाठी येथूनच बस सुटतात. केवळ २० बस थांबतील एवढ्या क्षमतेच्या या बसस्थानकावर इतका ताण वाढला आहे की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यत बसच्या रांगा लागतात.

धार्मीक पर्यटनाचा रस्ता

नाशिक रोड हे पश्चिम महाराष्ट्राला जोडणारे प्रमुख स्थानक आहे. पश्चिम महाराष्ट्रासह गुजरात, शहर, कसमादेत सह धुळ्यापर्यतच्या बस येथूनच लागतात. शिर्डी, वणी, त्र्यंबकेश्वर, शनी शिंगणापूर, पंढरपूर, तुळजापूर, कोल्हापूर अशा साडे तीन पीठ आणि प्रमुख तिर्थक्षेत्रांसाठी धार्मीक पर्यटनासाठीचा रस्ता नाशिक रोडहूनच जातो.

शहरातील २० लाख लोकसंख्येला देशात कुठल्याही भागात जाण्यासाठी नाशिक रोड रेल्वेस्थानकाला जोडूनचे बसस्थानक हाच पर्याय आहे. सहाजिकच रेल्वेचे सरासरी २० हजार, आंतरजिल्हा १३०० फेऱ्या, शहर वाहातूकीचे आणि रिक्षा टॅक्सीचे प्रवाशी असा सगळा ताण एकत्रित नाशिक रोड बसस्थानकावर पडतो.

शहर बससेवा

जे राज्य मार्ग परिवहन सेवेच तेच महापालिकेच्या सिटी लिंक परिवहन सेवेचे सातपूर, सिडको, पंचवटी, गंगापूर पासून तर त्र्यंबकेश्वर, सिन्नरसाठी सिटी लिंक सेवेच्या १०० बस आहेत. सहाजिकच परिवहन सेवेच्या ३५० फेऱ्या आणि सिटी लिंकच्या १०० बस, रोजच्या ५२ ते ५२ रेल्वेगाड्यांसाठी मिळून रोजच्या तिसेक हजार प्रवाशांसाठी एकच हक्काच म्हणून नाशिक रोड स्थानकाचे महत्व आहे.

हा ताणच आता इतका असह्य होत आहे की, स्थानकात बसला जागा नसतेच पण प्रवाशांना उभे राहूनच वेळ काढावा लागतो. भिकारी, अस्वच्छता, चोऱ्या, अवैध वाहातूकादारांचे अतिक्रमण, रिक्षा,टॅक्सी वाहातूकादारांचे आक्रमण हे अनुषांगिक विषय येथेही आहेच. स्थानकाबाहेर डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यत बस जागा मिळण्यासाठी रांगेत थांबून असतात. अस्वच्छता, अवैध प्रवाशी वाहातूकीचा ताण, बाकडे, चोऱ्या या अनुषांगिक समस्यांची चर्चा न न केलेली बरी. (latest marathi news)

vehicles parked in the bus station premises
Satana MSRTC Depot : जुन्याच बसेसमधून रामभरोसे प्रवास! नव्या गाड्यांची प्रतिक्षा; परिसरात खड्डे अन्‌ घाणीचे साम्राज्य

नियोजनकर्ते करतात काय

नाशिक शहर विस्तारत असतांना नाशिक शहराचे प्रमुख उपनगर आणि पश्चिम महाराष्ट्रात जाण्याचे प्रवेशद्वार असलेल्या नाशिक रोडला स्वारगेटच्या धर्तीवर सेंकड डेपोचा दर्जाची गरज आहे. पुढील २५ ते ३० वर्षाचा विचार करुन रेल्वे, परिवहन आणि शहरातील सिटी लिंक या तीन्ही सेवेच्या प्रवाशांना एकाच छताखालील पिकअप करणारी वाढीव जागा ही इथली गरज आहे.

- मध्य रेल्वेच्या गाड्या ९४
- सिटी लिंकच बस १००
- परिवहन सेवेच्या बस ३५०
- रिक्षा-टॅक्सी संख्या ४५०
- रोजची रेल्वे प्रवाशी २००००
- सिटी लिंक प्रवाशी ३००००
- आंतरजिल्हा प्रवासी २५०००

> कॉलेज सुटल्यानंतर गर्दी नियोजन नाही
> विद्यार्थी, महिला, मुलांसाठी धोकेदायक
> बस स्थानकातून काढण्यासाठी प्रतिक्षा
> बसस्थानकात ट्रव्हल गाड्याही पार्किंग

"अपुरी जागा हाच मूळ प्रश्न आहे. प्रवाशांची संख्या मोठी आहे. सिटीलिंक, परिवहन आणि रेल्वे, रिक्षा-टॅक्सी वाहातूकीचा ताण वाढत असतांना एसटी, सिटी लिंक किमान या दोन्ही यंत्रणाची तरी एकत्रित समन्वय व्यवस्था असावी. सिटी लिंकला आॅफीस असावे. खड्डे प्रवाशी सुविधांकडे लक्ष दिले पाहिजे. एक स्थानक आणि सतरा मालक अशी बेरभवाशाची व्यवस्था नसावी."

- गौतम सोनवणे (वृत्तपत्र विक्रेते)

vehicles parked in the bus station premises
Nandgaon MSRTC Depot : नादुरुस्त बस..? हमखास नांदगाव डेपोचीच

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.