Nashik News : नाशिक रोड, पंचवटीत मलवाहिकांचे जाळे; महासभेत 29 कोटींच्या कामांना मंजुरी

Nashik : तीन महिन्यांच्या कालावधीनंतर प्रथमच झालेल्या महासभेत मलनिस्सारण विभागाकडून जवळपास २९ कोटी ५० लाखांचे प्रस्ताव सादर करण्यात आले.
Fund
Fund esakal
Updated on

Nashik News : लोकसभा व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीची आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर तीन महिन्यांच्या कालावधीनंतर प्रथमच झालेल्या महासभेत मलनिस्सारण विभागाकडून जवळपास २९ कोटी ५० लाखांचे प्रस्ताव सादर करण्यात आले. यात नाशिक रोड, पंचवटी, गंगापूर रोड तसेच पाथर्डी फाटा भागातील नवीन नगरामध्ये मलवाहिकांचे जाळे टाकले जाणार आहे. १६ मार्चला लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागली. (Nashik Road Panchavati sewage network approved in Mahasabha worth 29 crore )

त्यानंतर २४ मेपासून विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघासाठी आचारसंहिता लागली. शिक्षक मतदारसंघाची आचारसंहिता ५ जुलैला संपुष्टात आली. त्यानंतर आता सप्टेंबर महिन्यात विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू होण्याची शक्यता असल्याने अंदाजपत्रकात तरतूद असलेली कामे कामे मार्गी लावण्यासाठी प्रशासकीय पातळीवर धावपळ सुरू आहे.

त्याचाच एक भाग म्हणून महासभा व स्थायी समितीवर मोठ्या प्रमाणात कामे मंजुरीला आहेत. आज एकूण ७५ विषय महासभेत मंजूर करण्यात आले, त्यातील ४१ विषय हे मलनिस्सारण व्यवस्थेशी संबंधित मंजूर करण्यात आले. नवीन नगरामध्ये मलनिस्सारण व्यवस्था बळकट करण्याचा भाग म्हणून मलनिस्सारण व्यवस्थेचे जाळे निर्माण केले जाणार आहेत.

या भागात मलवाहिकांचे जाळे

- पंचवटी विभाग : प्रभाग १ ते ६ मधील पेठ रोडवरील अमृत व उद्यान, इंद्रप्रस्थनगर, मानकर मळा, पिंगळे मळा, आडगाव- म्हसरूळ लिंक रोड, कलानगर, निसर्ग नगर, अक्षदा लॉन्स, वरदनगर, भगवान बाबानगर, निलगिरी बाग परिसर, कोणार्कनगर, आडगाव, शिवनगर, कळसकरनगर, मंडलिक मळा, मखमलाबाद, काशी माळी मंगल कार्यालय, शांतिनगर परिसर, काकडनगर, कृष्णनगर, राजमाता मंगल कार्यालय, पोकार कॉलनी, कलानगर, दत्ता मोगरे क्रीडा संकुल, रास रासबिहारी रोड, मानेनगर, पेठ रोड व एसटी डेपो, लीलावती हॉस्पिटल, मखमलाबाद गाव रोड, पवार लॉन्स, प्रभाग ४ मधील हमालवाडी शाळा, अनूसयानगर, शरदचंद्र पवार मार्केट परिसर, नामको हॉस्पिटल परिसर, प्रभाग ५ मधील मधुबन कॉलनी, राजपाल कॉलनी, विठ्ठल रुक्मिणी मंगल कार्यालय. (latest marathi news)

Fund
Nashik News : शैक्षणिक दाखल्यांचा ‘सर्व्हर डाऊन’! महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे प्रवेश रखडले

नाशिक रोड : प्रभाग २२ मधील देवळाली गाव, वडनेर, विहीतगाव, प्रभाग २१ मधील जयभवानी रोड परिसर, जवाहर मार्केट समोर, राजवाडा परिसर, प्रभाग २० मधील गंधर्वनगरी परिसर, प्रभाग १८ मधील बोराडे चौक ते एसटीपीपर्यंत, प्रभाग १९ मधील एकलहरे- सामनगाव रोड, बोराडे वस्ती, चेहडी गाव, चाडेगाव परिसर.

सिडको विभाग : राणा प्रताप चौक, शिवाजी चौक, गणेश चौक, अंबड, धात्रक मळा, पोद्दार शाळा ते गॅस गोडाऊन, उपेंद्रनगर, साईरामनगर, महालक्ष्मीनगर,

पूर्व विभाग : प्रभाग १६ मधील पोद्दार शाळेमागील ३० मीटर व डीपी रोड ते दत्तमंदिरापर्यंत, प्रभाग २३ मधील बजरंग सोसायटी कुर्डूकरनगर ते क्रोमा शोरूमपर्यंत. प्रभाग १४, १५.

पश्चिम विभाग- प्रभाग क्रमांक ७ ते १२

सातपूर विभाग- प्रभाग ८,९, १०,११, २६,३६ तसेच नदी व नाल्यांमधील सांडपाणी अडविणे.

Fund
Nashik News : जिल्ह्याचा 34 हजार 800 कोटींचा पत आराखडा; जिल्हाधिकारी शर्मा यांच्या हस्ते पुस्तिकेचे उद्‌घाटन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.