Nashik Fraud Crime : टीकटॉक, रिल्स फेम तरुणीला अल्बममध्ये अभिनयाचे काम देऊन, तिच्याशी मैत्री करून लग्नाचे आमिष देत शारीरिक संबंध प्रस्थापित करून नंतर हुंड्याची मागणी करून लग्नास नकार देत फसविल्याप्रकरणी कलाकार तरुणीच्या फिर्यादीवरून संशयित विनोद उर्फ सचिन कुमावत (रा. म्हाडा कॉलनी, सातपूर) या यूट्यूबरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Nashik Road Police registered case against YouTuber Sachin Kumawat nashik crime news)
कलाकार तरुणीला नृत्याची आवड असल्याने ती अभिनयाचे व्हिडिओ बनवून टीकटॉक या सोशल मीडियावर टाकत असे. नंतर या ॲपवर बंदी आल्याने युवतीने इन्स्टाग्रामवर रिल्स टाकण्यास सुरवात केली. इन्स्टाग्रामवरील अकाउंटवरून तिची सचिन कुमावतशी ओळख झाली. त्याने तिला अल्बममधील गाण्यात काम करण्याबाबत विचारणा केली असता, तरुणीने त्यास होकार दिला.
सचिन कुमावत ती राहत असलेल्या घरी आला आणि त्याने तिच्याशी अल्बममधील कामाबाबत निश्चित केले. त्यानंतर तरुणीवर गाणे चित्रित केले. हे गाणे सोशल मीडियावर चांगलेच प्रसिद्ध झाल्याने तरुणीला त्याने अजून काही गाण्यांचे काम दिले. त्यांच्यात मैत्री झाली. सचिन तरुणीला तिच्या घरी सोडण्यास आणि घेण्यासाठी येऊ लागला. पुढे त्याने तिला लग्नाची मागणी घातली.
तिच्या घराच्यांच्या संमतीने तिने त्याला लग्नाला होकार दिला. दरम्यान, सचिन हा विवाहित असल्याचे समजल्याने तिने त्याबाबत त्याच्याकडे विचारणा केली असता, त्याने शिवीगाळ करून मारहाण केली. नंतर त्याने तिची समजूत काढण्यासाठी पत्नीला घटस्फोट देणार असून, तुझ्याशीच लग्न करणार असल्याचे आश्वासन दिले.
संशयित सचिनच्या वाढदिवसानिमित्त दोन्हीही कुटुंबे त्र्यंबकेश्वरला गेले असता, सचिनच्या आईने कुटुंबाकडे दोन लाख रुपये हुंडा, पाच तोळे सोन्याची चेन आणि अंगठीची मागणी केली. त्यास तरुणीने नकार दिला.
त्यानंतर तरुणीने केलेल्या कामाचे पैसे दे व त्या पैशांतून दागिने व हुंडा देऊन लग्न करू, असे सांगितले असता त्यास सचिन याने नकार देऊन नंतर तरुणीशी संपर्क तोडला. अल्बममध्ये काम देणेही बंद केले व लग्नास नकार दिला. त्यांनतर आर्टिस्ट युवतीने पोलिसांत फिर्याद दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.