Nashik News : नाशिक रोड रेल्वेस्थानकाचा चेहरामोहरा बदलतोय! सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आतापासूनच होतेय सुधारणा

Nashik News : बारा वर्षांनी येणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी (Kumbh Mela) आतापासूनच येथे विविध सुधारणा केल्या जात आहेत.
NasMain entrance of railway stations.hik road Railway Station
NasMain entrance of railway stations.hik road Railway Stationesakal
Updated on

नाशिक रोड : नाशिक रोड रेल्वेस्थानक नाशिकनगरीचे प्रवेशद्वार आहे. रेल्वेने येणारे नागरिक रेल्वेस्थानकावर उतरताच नाशिकची ओळख होते. हे प्रवेशद्वार आधुनिक सुविधांनी सुसज्ज, आकर्षक असेल तर त्यातून पुढील नगरीची स्थिती लक्षात येते. त्यामुळे या स्थानकाचा मोठ्या प्रमाणात कायापालट केला जात आहे.

बारा वर्षांनी येणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी (Kumbh Mela) आतापासूनच येथे विविध सुधारणा केल्या जात आहेत. प्रवेशद्वाराचा विस्तार करून कायापालट केला आहे. अतिशय वर्दळीच्या फलाट क्रमांक दोन आणि तीनसाठी नवीन वर्षात उद्वाहन (लिफ्ट) व सरकता जिना (एस्केलेटर) कार्यान्वित होत आहे, जेणेकरून प्रवाशांना बाहेर पडण्यासाठी सध्या करावा लागणारा द्राविडी प्राणायाम काही अंशी कमी होईल. शिवाय वृद्ध व अपंग प्रवाशांना फलाटावर सहजपणे ये-जा करणे सुखकर होणार आहे. (Nashik road Railway Station Development marathi news)

सुमारे दहा महिन्यांपासून प्रगतिपथावर असलेली ही कामे लवकरच पूर्ण होतील. वार्षिक ६० कोटीहून अधिकचे उत्पन्न मिळविणाऱ्या नाशिक रोड रेल्वे स्थानकाचा ‘ए’ गटात समावेश होतो. दिवसभरात या स्थानकावर १०६ हून अधिक रेल्वेगाड्या थांबतात. या ठिकाणी फलाट एकवर उद्वाहन आहे, तर चारवर एक रॅम्प आहे.

मुख्य पुलास जोडणारा फलाट दोन, तीनवर जिना आहे. या ठिकाणी कुठलीही यांत्रिक व्यवस्था नव्हती. फलाट एकची लांबी कमी आहे. त्यामुळे मुंबईहून येणाऱ्या सर्वाधिक रेल्वे गाड्या फलाट दोनवर येतात, तसेच मुंबईकडे जाणाऱ्या गाड्या फलाट तीनवर येतात.

म्हणजे सर्वाधिक वर्दळीचे हे फलाट आहेत. फलाट दोन व तीनवर मोठ्या संख्येने प्रवासी ये-जा करतात. मुख्य पुलाला जोडण्यासाठी उद्वाहन व सरकत्या जिन्याची नितांत गरज होती. त्यानुसार हे काम हाती घेतले गेले आहे. फलटावरून वरील पुलास जोडणारी उद्ववाहन आहे.

मागील कुंभमेळ्यात नाशिक रोड रेल्वे स्थानकावर विविध सोयी सुविधांची उभारणी करण्यात आली होती. स्थानकावरील पूलही त्याचा एक भाग होता. आता आगामी कुंभमेळ्यापुर्वी फलाटावरून सहजपणे ये-जा करण्यासाठी सरकत्या जिन्याची सुविधा उपलब्ध होऊ शकेल. (Latest Marathi News)

NasMain entrance of railway stations.hik road Railway Station
HSC-SSC Exam Diet: परीक्षा काळात कसा असावा आहार? अभ्यासाच्या सततच्या बैठकीमुळे येतेय स्थूलता, ग्लानी; डॉक्टर काय सांगतात ?

कुंभमेळा मदतीची पर्वणी

कुंभमेळ्यानिमित्त शहराचा भौतिक विकास साधण्याची केंद्राकडून भरघोस आर्थिक मदत मिळण्याची ही पर्वणीच असते. विशेष म्हणजे या स्थानकासाठी असलेल्या रेल्वेच्या मालकीच्या इंच, इंच जागेचा व्यावसायिक वापर करण्यात आल्याने रेल्वेच्या उत्पन्नात भर पडली आहे. रात्री येणाऱ्या प्रवाशांना येथे उत्तम रेस्टॉरंट तसेच उत्तम वेटिंग रूम सुविधा निर्माण केल्या आहेत.

पूर्वी रेल्वे स्थानकाबाहेरील हॉटेल आता रात्री बंद होतात पण रेल्वेची रेस्टॉरंट सुविधा सुरू असल्याने प्रवाशांची गैरसोय होत नाही. रेल्वेस्थानकसमोरील टॅक्सी व रिक्षाचा मार्ग व्यवस्थित केला आहे. येथे जाहिरातीसाठी सुविधा केली आहे. तसेच मेडिकल सुरू केले आहे. यामुळे प्रवाशांना औषधांची उत्तम सुविधाही उपलब्ध आहे. एकूणच रेल्वे स्थानकाचा लुक पूर्ण बदलला जात आहे.

NasMain entrance of railway stations.hik road Railway Station
Health Care: सावधान! आपत्कालीन गोळीने हार्मोन्समध्ये वेगाने बदल; Pills गर्भधारणा टाळण्यासाठी योग्य नसल्याचा डॉक्टरांचा दावा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.