Nashik Road Traffic Safety Week: द्वारका चौकात शालेय विद्यार्थ्यांकडून प्रबोधन! शहर वाहतूक शाखेकडून उपक्रम

रस्ता वाहतूक सुरक्षा सप्ताहादरम्यान व्यापक स्वरुपात उपक्रम शहर वाहतूक शाखेकडून हाती घेतले जाणार आहेत.
Student giving rose to helmetless bike rider under road traffic safety campaign. Along with Assistant Commissioner Dr. Sachin Bari
Student giving rose to helmetless bike rider under road traffic safety campaign. Along with Assistant Commissioner Dr. Sachin Bariesakal
Updated on

नाशिक : राष्ट्रीय रस्ता वाहतूक सुरक्षा सप्ताहाअंतर्गत शहरातील सर्वाधिक रहदारीचा व वाहतूक कोंडी सापडणाऱ्या द्वारका सर्कल या ठिकाणी महापालिकेच्या उर्दू शाळेच्या विदयार्थिंनींनी बेशिस्त वाहनचालकांचे वाहतूक नियम पालन करण्याबाबत प्रबोधन केले.

दरम्यान, रस्ता वाहतूक सुरक्षा सप्ताहादरम्यान व्यापक स्वरुपात उपक्रम शहर वाहतूक शाखेकडून हाती घेतले जाणार आहेत.

रस्ता वाहतूक सुरक्षा सप्ताह असतानाही काहीशा उदासिनतेमुळे याकडे दूर्लक्ष झाल्याचे वृत्त ‘दै. सकाळ’मध्ये प्रसिद्‌ध झाले होते. (Nashik Road Traffic Safety Week Awareness by school students at Dwarka Chowk Initiatives for City Transport Department)

जानेवारीचा दुसरा आठवडा हा देशभरात रस्ता वाहतूक सुरक्षा सप्ताह म्हणून पाळला जात असतो. या सप्ताहादरम्यान वाहतूक नियमांचे वाहनचालकांनी काटेकोरपणे पालन करावे, तसेच अपघातांना आळा बसावा यासाठी प्रबोधनात्मक व जनजागृतीपर उपक्रम वाहतूक पोलीस व परिवहन प्रादेशिक विभागाकडून राबविले जातात.

परंतु यावेळी या विभागांची उदासिनता दिसून आली. यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर, नाशिक शहर वाहतूक पोलिस शाखेकडून १५ जानेवारी ते १४ फेब्रुवारी या दरम्यान राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत शहरभर व्यापक स्वरुपात प्रबोधनात्मक व जनजागृतीपर उपक्रम राबविण्याचे हाती घेतले आहेत.

त्यानुसार, द्वारका सर्कल याठिकाणी महापालिकेच्या उर्दू शाळेच्या ४० विद्यार्थिनींनी रस्ता वाहतूक सुरक्षा सप्ताहामध्ये सहभागी होत बेशिस्त वाहनचालकांचे प्रबोधन केले. द्वारका सर्कल याठिकाणी मोठ्याप्रमाणात वाहतूक कोंडी बेशिस्त वाहनचालकांमुळे होत असते.

Student giving rose to helmetless bike rider under road traffic safety campaign. Along with Assistant Commissioner Dr. Sachin Bari
PSI Convocation Ceremony: पोलीस कॉन्स्टेबल झालो तेव्हाच ‘कॅप’चे पाहिले होते स्वप्न! पैठणचा सलमान झाला पोलीस उपनिरीक्षक

त्यावेळी या विद्यार्थिनींनी विनाहेल्मेट चालकांना हेल्मेट परिधान करण्याचे आवाहन करताना त्यांना गुलाब पुष्प व चॉकलेट दिले. त्याचप्रमाणे, ट्रिपलसीट, राँगसाईटने वाहन चालविणारे वाहनचालक व रिक्षाचालकांनाही या विद्यार्थिनींनी वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले.

यावेळी विद्यार्थिनींनी हातांमध्ये वाहतूक नियमांचे पालन करणारे संदेश असलेले फलक हाती घेतले होते. याप्रसंगी सहायक आयुक्त डॉ. सचिन बारी, सहायक पोलीस निरीक्षक यतिन पाटील यांच्यासह उर्दू शाळेचे शिक्षक, वाहतूक पोलीसही उपस्थित होते.

"रस्ता वाहतूक सुरक्षा अभियान अधिक व्यापक स्वरुपाचे राबविण्यात येणार आहे. या अभियानात महाविद्यालयीन युवावर्गाचा सामावून घेऊन वाहनचालकांचे प्रबोधन केले जाईल. वाहतूक नियमांचे पालन केल्यास अपघात टाळता येतो. त्यासाठी वाहनचालकांना हेल्मेट, सीटबेल्ट यासह वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन आहे."

- चंद्रकांत खांडवी, पोलीस उपायुक्त, वाहतूक शाखा.

Student giving rose to helmetless bike rider under road traffic safety campaign. Along with Assistant Commissioner Dr. Sachin Bari
Nashik PSI Convocation Ceremony : आज घेतलेल्या शपथेचे सदैव स्मरण ठेवा : संजय कुमार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.