Nashik News : ‘निराधार’चे अनुदान खात्यात होणार जमा : रोहिदास वारूळे

Nashik : संजय गांधी निराधार, श्रावणबाळ व इंदिरा गांधी योजनेच्या माध्यमातून दर महिन्याला दिले जाणारे १५०० रुपये मानधन अदा केले जाते.
money
moneyesakal
Updated on

Nashik News : तालुक्यातील ज्येष्ठ नागरिकांसह निराधार महिलांना शासनाकडून संजय गांधी निराधार, श्रावणबाळ व इंदिरा गांधी योजनेच्या माध्यमातून दर महिन्याला दिले जाणारे १५०० रुपये मानधन अदा केले जाते. हे मानधन लाभार्थ्यांना कळवण तहसील स्तरावरून बँकेत पाठवून संबंधितांच्या खात्यात वर्ग करण्याची प्रक्रिया केली जात होती. मात्र, आता थेट डीबीटीमार्फत हे अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग केले जाणार आहे. (Rohidas Warule statement of needy will be deposited in grant account)

संजय गांधी निराधार, इंदिरा गांधी व श्रावणबाळ योजनेच्या लाभासाठी यापूर्वी तहसीलकडून संबंधित बँकेत सर्व लाभार्थींची यादी पाठवून त्यानुसार निधी दिला जात होता. तो निधी बँकेकडून संबंधित लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग केला जात होता. या प्रक्रियेस विलंब होत असल्याने वयोवृद्ध लाभार्थ्यांना अनुदानासाठी बँकेत चकरा माराव्या लागत होत्या.

मात्र, आता निराधारांचे अनुदान थेट डीबीटीमार्फत मिळणार असल्याने निराधारांची हेळसांड थांबून बँक कर्मचाऱ्यांची ही कसरत थांबणार आहे. त्यासाठी या तिन्ही योजनांचा लाभ घेत असलेल्या पात्र निराधारांकडून आधार कार्ड आणि मोबाइल क्रमांक संकलित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. याबाबत गाव स्तरावर तलाठी कागदपत्रे जमा करीत आहेत.

आधार कार्डसाठी मंडळनिहाय कॅम्प

कळवण तालुक्यातील संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेसाठी आधार कार्ड लिंकवर अपटेड करण्यासाठी मंडळनिहाय शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. १३ जुलै ते १९ जुलैपर्यंत सदर मंडळ कार्यालयात लाभार्थ्यांनी संपर्क करावा. आधार कार्डशी लिंक केल्यानंतरच खात्यात रक्कम जमा होणार असल्याने लाभार्थींचे आधार कार्ड अपडेट असणे गरजेचे आहे. ज्यांचे आधार अपडेट नाही, त्यांनी तत्काळ आधार अपडेट करून घ्यावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. (latest marathi news)

money
Nashik News : अंबड, सातपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांनी संपवले जीवन

''मानधन आता डीबीटीच्या माध्यमातून थेट बँक खात्यात वर्ग केले जाणार आहे. संबंधित योजनांच्या लाभार्थींनी आपले आधार कार्ड व मोबाइल क्रमांक गावातील तलाठ्यांकडे द्यावे. तसेच, आपले आधार कार्ड अपडेट करून बँक खात्याला मोबाइल क्रमांक लिंक करावा.''- रोहिदास वारुळे, तहसीलदार, कळवण

कळवण तालुक्यातील लाभार्थी संख्या

योजनेचे नाव लाभार्थी संख्या

संजय गांधी निराधार अनुदान : १३१९

श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन : ४७७

इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन : ८७२

इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन : १९९

इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन : १९

राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य लाभ योजना : ८

एकूण लाभार्थी : २८९४

money
NashiK News : नाशिक विमानसेवेचे पंख छाटू नका! खासदार राजाभाऊ वाजे आक्रमक; उड्डाण विभागाला विचारला जाब

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.