RTE Admission : जिल्ह्यात जागा 5 हजार अन अर्ज आले 15 हजार; आरटीईच्या प्रवेशाच्या निर्णयाकडे विद्यार्थी-पालकांचे लक्ष

Nashik News : बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकारानुसार खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये पहिली ते आठवीसाठी प्रवेश स्तरावर २५ टक्के जागा वंचित व दुर्बल घटकातील मुला-मुलींसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे.
RTE Admission
RTE Admission esakal
Updated on

येवला : यंदा सुरुवातीपासून वादग्रस्त ठरलेल्या आरटीईच्या प्रवेशासाठी न्यायप्रविष्ठ बाबीचा अडसर आहे. यासंदर्भात उद्या बुधवारी (ता.१२) निर्णय होणार असल्याने विद्यार्थी पालकांचे न्यायालयाच्या प्रक्रियेकडे लक्ष लागले आहे. १२ तारखेनंतरच प्रवेशास पात्र विद्यार्थ्यांचे नावे स्पष्ट होणार आहे. नाशिक जिल्ह्यातून ५२७१ जागांसाठी तब्बल १५ हजार अर्ज आल्याने एकास तीन या प्रमाणातील इच्छुकांमधून लॉटरीने विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचे भविष्य ठरणार आहे. (Nashik RTE Admission)

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकारानुसार खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये पहिली ते आठवीसाठी प्रवेश स्तरावर २५ टक्के जागा वंचित व दुर्बल घटकातील मुला-मुलींसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे. आतापर्यत इंग्रजी माध्यमाच्या शाळांपुरता असलेल्या या विषयात शिक्षण विभागाने कायद्यात बदल करून शासकीय.

अनुदानित व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये प्राधान्याने प्रवेश देण्याचा निर्णय घेतला. अप्रत्यक्षरित्या खासगी इंग्रजी शाळा आरटीईतून वगळल्याने या निर्णयाला पालकांनी न्यायालयात आव्हान देत स्थगित केला.याबदलामुळे पालकांचे समाधान असून प्रवेशासाठी प्रतिसादही उत्स्फूर्त आहे.

जिल्ह्यात ४२८ इंग्रजी माध्यमाच्या शाळांत ५ हजार २६८ जागावर प्रवेश अर्ज भरण्यासाठी पोर्टल सुरू होताच पहिल्या दिवशी १२२४ अर्ज दाखल झाले होते. विहित मुदतीत जिल्ह्यातून १४ हजार ८०० अर्ज प्रवेशासाठी दाखल झाले आहे, त्यामुळे ५२७१ जागांचे प्रवेश लॉटरीतूनच ठरणार आहे. राज्यातील नऊ हजार २१७ शाळांतील जागांसाठी दोन लाख ४२ हजार ८७९ अर्ज आले आहेत. त्यातील एक लाख पाच हजार ३९९ विद्यार्थ्यांना या प्रक्रियेत प्रवेश मिळणार आहे. हे प्रवेश ऑनलाइन सोडत काढून दिले जाणार आहे. (latest marathi news)

RTE Admission
Nashik News : पालकमंत्र्यांच्या मतदारसंघातील गाव स्मशानभूमीपासून वंचित!

प्रवेशाकडे लक्ष

जिल्हानिहाय उपलब्ध जागा प्रवेशासाठीची शिक्षण आयुक्त सूरज मांढरे, प्राथमिक शिक्षण संचालक, माध्यमिक शिक्षण संचालक संपत सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत शुक्रवारी विद्यार्थ्यांच्या हस्ते सोडत काढण्यात आली. मात्र, न्यायालयीन प्रकरणामुळे विद्यार्थ्यांची निवड यादी १२ जूननंतर जाहीर करण्यात येणार असल्याने आता पालकांचे लक्ष पुढील निर्णयाकडे लागले आहे.

"आरटीईच्या २५ टक्के राखीव जागांवर प्रवेश देणाऱ्या खासगी शाळांवर शिक्षण विभागाचे लक्ष असेल. आरटीई जागांवर प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना दुय्यम वागणूक मिळत असल्याच्या तक्रारी विभागाकडे येत आहेत. त्यामुळे ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधित शाळांची अचानकपणे तपासणी केली जाईल. गैरप्रकार टाळण्यासाठी कागदपत्रांची बारकाईने तपासणी केली जाणार आहे. हे प्रवेश ऑनलाइन सोडत काढून दिले जात असून व्यवस्थेबद्दल कोणी भ्रम निर्माण करत असेल, तर वेळीच ते शिक्षण विभागाच्या निदर्शनास आणून द्यावे." - सूरज मांढरे,शिक्षक आयुक्त,पुणे

RTE Admission
Nashik Onion News : कांदा पुन्हा रडवणार महिन्यात भाव दुप्पट

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.