RTE Admission : आरटीई प्रवेश प्रक्रियेचे वराती मागून घोडे! 2 महिने उशिराने शाळा नोंदणी

Nashik News : प्रवेश प्रक्रियेचे वराती मागून घोडे सुरू असून, जिल्ह्यातील चार हजार ६८७ शाळांतून नोंदणी होईल
RTE Admission
RTE Admissionesakal
Updated on

येवला‌ : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) देण्यात येणाऱ्या २५ टक्के आर्थिक दुर्बल आणि वंचित घटकांमधील मुलांना प्रवेश मिळण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या प्रक्रियेला यंदा तब्बल दोन महिने उशीर झाला असून, आताशी शाळा नोंदणी सुरू झाली आहे. (RTE Admission) प्रवेश प्रक्रियेचे वराती मागून घोडे सुरू असून, जिल्ह्यातील चार हजार ६८७ शाळांतून नोंदणी होईल. सोमवार (ता. १८)पर्यंत नोंदणी पूर्ण करण्याचे बंधन आहे. (Nashik RTE admission process at yeola marathi news)

शिक्षण विभागातर्फे दरवर्षी डिसेंबर किंवा जानेवारीत प्रवेश प्रक्रियेला सुरवात होऊन मार्चमध्ये विद्यार्थ्यांची नोंदणीही सुरू होत होती. या वर्षी मात्र आताशी शाळांची नोंदणी सुरू आहे. प्रक्रियेचे संभाव्य वेळापत्रकही जाहीर नसल्याने ही प्रक्रिया लांबणीवर पडणार आहे.

प्रवेश सक्ती, पण शुल्क थकले

यंदापासून शिक्षण विभागाने सरकारी, अनुदानित शाळेच्या एक किलोमीटर परिसरात येणाऱ्या शाळांना वगळले आहे. शाळा वाढविल्या असल्या, तरी अनेक वर्षांपासून शुल्क वेळेत मिळत नसल्याने काही शाळा बाहेर पडत आहेत. राज्यातील सुमारे एक लाखापेक्षा जास्त जागांवर विद्यार्थी आरटीई अंतर्गत ऑनलाइन प्रवेश घेतात.

विद्यार्थ्यांचे शुल्क राज्य शासनाकडून शाळांना दिले जाते. मात्र, शुल्क पूर्तीला विलंब होत असून, शाळाचालकांमध्ये नाराजी आहे. सर्वच शाळांचे कोट्यवधींचे शुल्क थकीत आहे. याबाबत अधिवेशनातही प्रश्न उपस्थित झाला होता.

शुल्क वाढ केव्हा?

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत शाळांना शुल्क प्रतिपूर्तीचा दर प्रतिविद्यार्थी १७ हजार ७६० रुपये निश्चित केला आहे. २०१२-१३ मध्ये हा दर १२,३१५ रुपये, तर २०१५-१६ मध्ये १७,३२९ रुपये होता. २०१८-१९ मध्ये १७,६७० रुपये आहे. त्यानंतर यात कुठलीही वाढ झालेली नाही. त्यामुळे शुल्क वाढ केव्हा होणार, असा प्रश्न संस्थाचालकांना पडला आहे.

शाळा व प्रवेश वाढणार

मागील वर्षी आरटीई प्रवेश प्रक्रियेत राज्यात आठ हजार ८२७ शाळांमध्ये १ लाख १ हजार ९२६ जागा होत्या. जिल्ह्यातील ४०१ शाळांमध्ये ४ हजार ८५४ जागा प्रवेशासाठी होत्या. या वर्षी जिल्ह्यातील चार हजार ६८७ शाळा पात्र असून, यातील ५५७ च्या आसपास शाळा नोंदणी करून सहभागी होण्याचा अंदाज आहे. (latest marathi news)

RTE Admission
Nashik Onion Rates Fall: आठवड्यात कांदा 400 ते 500 रुपयांनी घसरला! गुजरातमधून आवक होत असल्याचा परिणाम; शेतकऱ्यांमध्ये चिंता

२०२३-२४ मधील जागा

महाराष्ट्र

पात्र शाळा- ८८२०

प्रवेश क्षमता- १ लाख १ हजार ८८१

नाशिक

पात्र शाळा- ४०१

प्रवेश क्षमता- ४ हजार ८५४

जिल्ह्यातील ‘आरटीई’च्या शाळा

देवळा- १४८

नाशिक- १७४

नाशिक युआरसी- ४३६

नांदगाव- २८५

त्र्यंबकेश्वर- २७३

सिन्नर- २९१

पेठ- १९६

येवला- २९९

इगतपुरी- २६३

निफाड- ३१७

बागलाण- ३९३

चांदवड- २१७

सुरगाणा- ३२८

मालेगाव- ४०६

मालेगाव मनपा- १५७

दिंडोरी- २६१

कळवण- २४३

एकूण- ४६८७

RTE Admission
Nashik News : तलाठी 'तात्यां’च्या निवाऱ्यासाठी ‘काकां’चे प्रयत्न फळाला! निफाड तालुक्यात नवीन 10 तलाठी कार्यालयातून कामे सुरू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.