Nashik News : राज्य शासनाने आरटीई प्रवेश पद्धतीत बदल करण्यासाठी ९ फेब्रुवारीला काढलेली अधिसूचना न्यायालयाने रद्द केल्याने दीड महिन्यांपासून रखडलेल्या प्रवेश प्रक्रियेचा मार्ग खुला झाला आहे. यावर, राज्याच्या शिक्षण उपसंचालकांनी पत्र काढत, ही प्रवेश प्रक्रीया सुरू करण्याचे निर्देश दिले आहे. त्यानुसार २३ जुलैपासून ही प्रक्रियेस प्रारंभ होईल. (RTE admission process starts from Tuesday)
आरटीईअंतर्गत खासगी शाळांमध्ये २५ टक्के रिक्त जागांवर प्रवेश देण्यासंदर्भात खासगी शाळांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. परिणामी मागील दीड महिन्यापासून प्रवेश प्रक्रिया रखडली होती. यावर मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी आरटीई प्रवेश पद्धतीत बदल करण्यासाठी काढलेली अधिसूचना न्यायालयाने रद्द केल्याने पालकांना दिलासा मिळाला आहे.
दरम्यान खासगी शाळा पोर्टलवर नसल्याने त्या शाळांमधील प्रवेशाला मुकावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. निर्णय लागल्यानंतर आता खासगी शाळेत पुन्हा प्रवेशप्रक्रिया राबविली जाते की आहे त्याच सोडतीवर प्रवेश दिला जातो. (latest marathi news)
याबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. आरटीई पोर्टलद्वारे ४ जूनपर्यंत ऑनलाइन अर्ज मागविल्यानंतर ७ जूनला ऑनलाइन लॉटरी काढण्यात आली.
याचिका दाखल असल्याने निवड झालेल्या मुलांच्या प्रवेशासंदर्भात प्रतिक्षा संपली आहे. शिक्षण विभागाने निवड यादी व प्रतीक्षा यादी जाहीर करण्याचे आदेश दिल्याने, लवकरच ही यादी प्रसिद्ध होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.