Nashik News : आरटीओ कॉर्नर सिग्नल बंद वाहनचालकांची कसरत; अपघात नित्याचे

Nashik : नाशिक शहरात सध्या स्मार्टसिटी अंतर्गत अद्यावत सिग्नल यंत्रणा बसविण्यात येत आहेत.
Unruly and dangerous traffic due to RTO corner signal off
Unruly and dangerous traffic due to RTO corner signal offesakal
Updated on

Nashik News : नाशिक शहरात सध्या स्मार्टसिटी अंतर्गत अद्यावत सिग्नल यंत्रणा बसविण्यात येत आहेत. मात्र, या सुधारणेमुळे बऱ्याच ठिकाणी सिग्नल यंत्रणा बंद असल्याने वाहनधारकाची चांगलीच तारांबळ होताना दिसत आहे. यामुळे छोटे- मोठे अपघाता हे नित्याचे झाले असून याकडे प्रशासनाने तात्काळ लक्ष द्यावे. सदर सिग्नल यंत्रणा सुरू करावी, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे. दिंडोरी रोड रहदारीचा आहे. (RTO corner signals of drivers practice accidents are common )

या रोडवर शहर हद्दीपासून पंचवटीपर्यंत एकूण पाच चौफुल्या आहेत. यातील रिलायन्स पेट्रोलपंप, आरटीओ कॉर्नर, तारवालानगर या चौफुलींवर वाढते अपघाताचे प्रमाण बघता उपाययोजना म्हणून सिग्नल यंत्रणा बसविण्यात आली होती. यातील रिलायन्स पेट्रोलपंप व तारवालानगर सिग्नल यंत्रणा सुरू आहे, मात्र, दिंडोरी - पेठ रोड , रासबिहारी लिंक रोडमार्गे मुंबई महामार्गाकडे जाणाऱ्या चौफुलीवरील आरटीओ कॉर्नर सिग्नल यंत्रणा बंद आहे. स्मार्टसिटीअंतर्गत शहरात सिग्नल यंत्रणा बसविण्यात येत आहे. (latest marathi news)

Unruly and dangerous traffic due to RTO corner signal off
Nashik News : इगतपुरी नगरपरिषदेच्या पाणी पुरवठा कर्मचाऱ्याचा भरदिवसा खुन

यातच आरटीओ कॉर्नर चौफुलीवर येथे नवीन सिग्नल यंत्रणा बसविण्यात आली आहे. मात्र, आठ ते दहा दिवसांपासून ती बंद आहे. दिंडोरी रोड मार्गावर दुचाकी चारचाकी, अवजड वाहने अशी रहदारी कायम सुरू असते. यातच सकाळी व सायंकाळी चाकरमान्यांची धावपळ सुरू असते. सिग्नल बंद असल्याने छोटे-मोठे अपघात हे नित्याचे झाले आहेत. तरी देखील स्मार्ट सिग्नल यंत्रणा लवकरात लवकर कार्यान्वित व्हावी अशी मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.

''दिंडोरी रोड आरटीओ कॉर्नर येथील सिग्नल यंत्रणा नऊ ते दहा दिवसापासून बंद आहे. बेशिस्त वाहतुकीचे दर्शन घडतं आहे. पेठ रोडकडून येणारे अवजड वाहने आरटीओ कॉर्नरमार्गे मुंबई आग्रा महामार्गाकडे जात असतात. त्यामुळे वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे. सिग्नल यंत्रणा बंद असल्याने छोटे मोठे अपघातदेखील होत आहेत.''- रवी गायकवाड, स्थानिक रहिवाशी.

Unruly and dangerous traffic due to RTO corner signal off
Nashik News : मराठीला अभिजात दर्जा मिळण्याच्या अपेक्षा उंचावल्या; संमेलनाच्या निमित्ताने मागणीला मिळेल बळकटी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.