Nashik News : दोन वर्षांपूर्वी कझाकस्तान येथील आयर्न मॅन स्पर्धेत नाशिक पोलिस दलाचे नाव कोरल्यानंतर धावपटू अश्विनी देवरे यांनी दक्षिण आफ्रिकेतील ‘द कॉम्रेड्स मॅरेथॉन’ ही ९० किमी धावण्याची स्पर्धा अत्यंत खडतर व प्रतिकूल वातावरणात यशस्वीरीत्या पूर्ण करीत आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. (Runner Ashwini Devere successfully completed Comrades Marathon in South Africa)
देशभरातील पोलिस दलामध्ये अश्विनी देवरे या अशी कामगिरीची नोंद करणाऱ्या एकमेव महिला पोलिस कर्मचारी ठरल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेत ९० किलोमीटर धावण्याची द कॉम्रेड मॅरेथॉन स्पर्धा सोमवारी (ता. १०) पार पडली. नाशिक शहर पोलिस दलामध्ये महिला हवालदार असलेल्या अश्विनी देवरे यांनी गेल्या जानेवारी महिन्यापासून या स्पर्धेची तयारी सुरू केली होती.
अथक परिश्रम घेतल्यानंतर त्यांनी दक्षिण आफ्रिकेतील या स्पर्धेत सहभाग घेतला. ९० किमी अंतर धावण्याच्या या स्पर्धेमध्ये अश्विनी देवरे यांनी ११ तास ४८ सेंकदामध्ये हे अंतर यशस्वीरीत्या पार केले आहे. ही स्पर्धा पार करणाऱ्या देशभरातील पोलिस दलातील महिला पोलिस कर्मचारी ठरल्या आहेत. तसेच, नाशिक शहर पोलिस दलाचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर पुन्हा कोरले आहे. (latest marathi news)
अश्विनी देवरे यांनी या स्पर्धेचे ठिकाण आणि तेथील वातावरण थंड असल्याने नाशिकमध्ये रात्रीच्या वेळी धावण्याचा सराव केला. त्यासाठी त्यांनी नाशिक ते त्र्यंबकेश्वर, नाशिक ते सिन्नर, नाशिक ते देवळाली कॅम्प व परिसरात रात्रीच्या वेळी धावण्याचा सराव केला. रात्री ११ ते पहाटे ६ वाजेपर्यंत त्या धावण्याचा सराव एकट्याने करीत होत्या.
विशेषतः: यासाठी त्यांना पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांचे प्रोत्साहन मिळाले होते. यामुळे त्यांना ‘द कॉम्रेड्स मॅरेथॉन’ या स्पर्धेत नाशिकचे नाव उंचावता आले. अश्विनी देवरे यांनी बजावलेल्या कामगिरीचे सर्वस्तरातून कौतुक होते आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.