Asian Para Games : नाशिकच्या गावितच्या सुवर्ण कामगिरीने भारताच्या पदकांची शंभरी! पंतप्रधान मोदींकडून कौतुक

Nashik runner Dilip Gavit won gold medal in asian para game news
Nashik runner Dilip Gavit won gold medal in asian para game newsesakal
Updated on

Asian Para Games : येथे सुरू असलेल्‍या आशियाई पॅरा स्‍पर्धेत शनिवारी (ता. २८) नाशिकचा धावपटू दिलीप महादू गावित याने भारताला सुवर्णपदक जिंकून दिले. ४०० मीटर पुरुष गटात धावताना त्‍याने अव्वल क्रमांक पटकावला. (Nashik runner Dilip Gavit won gold medal in asian para game news)

त्‍याच्‍या या पदकाने स्‍पर्धेतील भारताने जिंकलेल्‍या एकूण पदकांचा आकडा शंभरीवर पोचला. याची दखल घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलीपसह सर्व पदकविजेत्‍या खेळाडूंचे ‘एक्‍स’वर अभिनंदन केले.

चीन येथे सुरू असलेल्‍या चौथ्या आशियाई पॅरा ॲथलेटिक्स स्‍पर्धेत सहभागी होताना दिलीपने ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. दिलीपने ४९.४८ सेकंदात स्‍पर्धा पूर्ण करताना सुवर्णपदावर आपले नाव कोरले. या गटातून इंडोनेशिया प्रदना नूर फेर्री याने ४९.८२ सेकंद वेळ नोंदविताना द्वितीय क्रमांकासह रौप्यपदक पटकावले.

Nashik runner Dilip Gavit won gold medal in asian para game news
Asian Para Games : @111! आतापर्यंतची सर्वात मोठी कामगिरी करत एशियन पॅरा गेम्समध्ये भारताने इतिहास रचला

श्रीलंकेचा धावपटू सुबसिंघे मारा याने ५०.३७ सेकंद अशी वेळ नोंदविता कांस्‍य पदक पटकावले आहे. या गटात भारताचा जसबीर हा चौथ्या क्रमांकावर राहिला. दरम्‍यान, दिलीपच्‍या या पदकाने भारताच्‍या पदक तालिकेत एकूण पदकांचा आकडा शंभरावर पोचला. त्‍यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत दिलीपसह सर्व पदकविजेत्‍या खेळाडूंचे अभिनंदन केले.

...तर आणखी एक पदक मिळाले असते

दिलीपने आजवर अनेक स्‍पर्धांमध्ये पदक जिंकलेले असून, मुख्यत्वे चारशे मीटर आणि दोनशे मीटर गटातील स्‍पर्धेत त्‍याचा सहभाग असतो. आशियाई पॅरा स्‍पर्धेत यंदा २०० मीटर गटाचा समावेश नाही. या गटाचा जर समावेश असता तर दिलीपने भारताला आणखी एक पदक जिंकून दिले असले, असा विश्‍वास त्‍याचे प्रशिक्षक वैजनाथ काळे यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्‍यक्‍त केला.

Nashik runner Dilip Gavit won gold medal in asian para game news
Para Asian Games : पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची १११ पदकांची कमाई

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.