Nirmal Vari : ‘निर्मल वारी’च्या प्रस्तावाला मोठी कात्री! ‘ग्रामविकास’कडून पावणेसहा कोटींचा प्रस्ताव सव्वादोन कोटींवर

Nashik News : संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी जिल्हा परिषदेने तयार केलेला पाच कोटी ६८ लाखांचा प्रस्ताव ग्रामविकास विभागाने फेटाळला आहे.
rural development department rejected proposal of five crore 68 lakhs prepared by Zilla Parishad
rural development department rejected proposal of five crore 68 lakhs prepared by Zilla Parishadesakal
Updated on

Nashik News : संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी जिल्हा परिषदेने तयार केलेला पाच कोटी ६८ लाखांचा प्रस्ताव ग्रामविकास विभागाने फेटाळला आहे. या आराखड्यात वारकऱ्यांना मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी सव्वादोन कोटी देण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषदेने फेरसादर केला असून, त्याला सोमवारी (ता. १४) मान्यता मिळण्याची शक्यता आहे. (rural development department rejected proposal of five crore 68 lakhs prepared by Zilla Parishad)

आषाढी एकादशीनिमित्त त्र्यंबकेश्‍वर ते पंढरपूरपर्यंत पायी दिंडी सोहळा जातो. संत निवृत्तिनाथांच्या दिंडीला मानाचे स्थान असल्याने राज्य शासनाने गेल्या वर्षी ‘निर्मल वारी’तून त्यासाठी निधी देण्याची घोषणा केली. त्याआधारे जिल्हा परिषदेने पाच कोटी ६८ लाखांचा प्रस्तावही राज्य शासनाकडे पाठवला.

आराखड्यात वॉटरप्रूफ मंडप, स्टेज, अग्निशमन सुविधा, पावसापासून सरंक्षणासाठी गोल मंडप, साउंड सिस्टिम, जनरेटर, लाइट व्यवस्था, फिरते शौचालय, स्नानगृह, शासकीय कर्मचारी भोजन व्यवस्था, पालखीमध्ये समाविष्ट पशुधन खर्च, मुक्कामाच्या ठिकाणी असलेल्या ग्रामपंचायतींना मूलभूत सुविधा देण्यासाठीही निधी तरतूद केली होती.

एकूण सतरा बाबींचा समावेश असलेल्या पाच कोटी ६८ लाखांचा प्रस्ताव ग्रामविकास विभागाचे सचिव डवले यांनी बुधवारी (ता. १२) फेटाळून लावला. राज्यातील सर्व दिंड्यांना एकसमान सुविधा पुरवल्या जातील. यात फिरते शौचालये, स्नानगृह, पाण्याची व्यवस्था सरकारमार्फत पुरविण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मूलभूत सुविधांचा समावेश असलेला नवीन प्रस्ताव सादर करण्याचे आदेश त्यांनी जिल्हा परिषदेला दिले. त्यानुसार जिल्हा परिषदेने दोन कोटी २४ लाख ६६ हजारांचा प्रस्ताव गुरुवारी (ता. १३) ग्रामविकास विभागाकडे सादर केला आहे. येत्या मंगळवारपर्यंत त्याला मान्यता मिळण्याची शक्यता आहे. त्र्यंबकेश्‍वर येथून येत्या गुरुवारी (ता. २०) दिंडीचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान होणार आहे. (latest marathi news)

rural development department rejected proposal of five crore 68 lakhs prepared by Zilla Parishad
Nashik News : विद्यार्थ्यांना शाळेत मिळणार चवदार पदार्थांची मेजवानी; प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत आहारात सुधारणा

नवीन प्रस्ताव

बाब....................संख्या........प्रतिनग दर........दिवस.......आवश्‍यक निधी

फिरते शौचालय-...२५०...........२५००........२६......एक कोटी ६२ लाख ५० हजार

पाण्याचे टँकर........६................६०००.........२६......नऊ लाख ३६ हजार

टँकर येताना.........१................६०००..........२०.........एक लाख २० हजार

रुग्णवाहिका.........२................१०,०००.....२८...........पाच लाख ६० हजार

स्नानगृह, निवारा केंद्र....१.......३०००००....७............२१ लाख रु.

जनरेटर, लाइट, मंडप.....२...........५००००....२५..........२५ लाख रु....

एकूण...........................२६१................................दोन कोटी २४ लाख ६६ हजार

आज पुन्हा होणार बैठक

आषाढी वारीच्या अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी (ता. १४) राज्यातील प्रमुख वारकऱ्यांची मुख्यमंत्र्यांच्या सह्याद्री अतिथीगृह येथे सायंकाळी पाचला बैठक बोलावली आहे. या बैठकीत संत निवृत्तिनाथ पालखी सोहळ्याच्या आराखड्याचा विषय उपस्थित करण्यात येणार असल्याचे धर्मवीर आध्यात्मिक सेनेचे सहअध्यक्ष नीलेश गाढवे यांनी सांगितले.

rural development department rejected proposal of five crore 68 lakhs prepared by Zilla Parishad
Nashik News : नांदूर-मानूर परिसरातील गाळ मिश्रित पाणी; शुद्ध पाणीपुरवठा करण्याची नागरिकांची मागणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.