Nashik News : त्र्यंबकेश्वर रोडवरील पहिने येथे चार दिवसांपूर्वी धबधब्याच्या पाण्यात दोन गटांमध्ये राडा झाला होता. त्या पार्श्वभूमीवर रविवारी (ता. २१) ग्रामीण पोलिसांनी चोख नाकाबंदी करीत मद्यपी, हुल्लडबाजांविरोधात धडक कारवाई केली आहे. निसर्गाच्या सान्निध्यात आनंद लुटताना काही मद्यपी व हुल्लडबाज तरुणांमुळे कुटुंबीयांसह आलेल्या पर्यटकांना मनस्तापाला गेल्या आठवड्यात सामोरे जावे लागले होते. (Rural police in Phone set strict blockade against drunkards and hooligans )
तर, पोलिसांकडून केवळ बघ्याची भूमिका घेण्यात आली होती. या वेळी मात्र ग्रामीण पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. यंदाचा पावसाळा अद्यापही कोरडाच आहे. गेल्या शनिवारी-रविवारी पावसाने नाशिकसह त्र्यंबकेश्वर परिसरात हजेरी लावली होती. परंतु, त्यानंतर पावसाने पुन्हा दडी दिली असून, अद्यापही समाधानकारक पाऊस नाही. परंतु त्र्यंबकच्या सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये झालेल्या रिमझिम पावसामुळे ब्रह्मगिरी पर्वतावरून धबधबे वाहू लागले आहेत. हेच धबधबे आणि येथील डोंगरदऱ्यातील निसर्ग पर्यटकांना खुणावत असतो.
पावसाळ्यात त्र्यंबकसह पहिने, दुगारवाडी, जव्हार-मोखाडा या परिसरात पावसाळी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची कुटुंबीयांसह तर तरुणाईची मौजमस्तीसाठी रेलचेल असते. मात्र पावसाचा आनंद घेतानाच काही हुल्लडबाज, मद्यपी, टवाळखोरांमुळे गालबोट लागते. गेल्या आठवड्यात पहिने येथे दोन गटांत वाद होऊन हाणामारीची घटना घडली होती. अशा घटनांना आळा घालण्यासाठी ग्रामीण पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी अधिसूचनाच जारी केलेली आहे. (latest marathi news)
गेल्या शनिवारी-रविवारी ग्रामीण पोलिसांनी अधीक्षकांच्या अधिसूचनेला धुडकावून लावत केवल बघ्याची भूमिका घेतली होती. रविवार (ता. २१) मात्र, ग्रामीण पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी करीत वाहन तपासणी सुरू केल्याचे दिसून आले. पहिने येथे बंदोबस्तासह चार ठिकाणी पॉइंट लावून नाकाबंदी करीत वाहनांची तपासणी केली जात होती. वाहनांची तपासणी करताना मद्यसाठा नेणाऱ्यांविरोधात कारवाईचा बडगा उगारला. यामुळे काहींनी दुसऱ्या पर्यटनस्थळाची वाट धरली, तर काहींनी मार्ग बदलल्याचे दिसून आले.
दंडात्मक कारवाई
त्र्यंबक रोडवर ठिकठिकाणी ग्रामीण पोलिसांनी नाकाबंदी करीत वाहनांची तपासणी केली. या वेळी मद्यसेवन करणाऱ्या नऊ वाहनचालकांविरोधात ‘ड्रंक अॅन्ड ड्राईव्ह’ची कारवाई करीत दंड ठोठावला. तसेच वाहक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ट्रिपलसीट, विनाहेल्मेट, विनासीटबेल्ट चालकांविरोधात कारवाईचा बडगा उगारला. यातून पोलिसांनी ७२ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करीत बेशिस्त वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली. पोलिसांच्या कारवाईमुळे हुल्लडबाजांना मात्र आळा बसला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.