Nashik Crime: नाशिक ग्रामीण पोलिसांचे गुटखा विक्रेत्यांवर छापे; जिल्ह्यात 10 गुन्हे दाखल

Crime News
Crime Newsesakal
Updated on

Nashik Crime : अवैध धंद्यांविरोधात नाशिक ग्रामीण पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारल्यानंतर, आता प्रतिबंधित गुटख्याविरोधात जिल्हाभर छापासत्र सुरू आहे. पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाने दोन दिवसात १० विक्रेत्यांविरोधात गुन्हे दाखल करून सुमारे ६० हजारांचा गुटखा जप्त केला आहे.

ग्रामीण पोलिसांच्या या कारवाईने जिल्ह्यातील चोरीछुप्यारितीने गुटखा विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे. (Nashik Rural Police raids Gutkha sellers 10 cases registered in district Crime)

नाशिक ग्रामीण पोलिसांनी गेल्या आठवड्यात इगतपुरी व घोटी पोलिस ठाण्याच्या हद्दीतून प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक करणारे दोन कंटेनर पकडले होते. त्यामुळे पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांच्या विशेष पथकाने आता जिल्हाभर प्रतिबंधित गुटख्याची विक्री करणाऱ्यांविरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे.

मंगळवारी (ता. ६) पोलिसांनी जिल्ह्यात पाच गुन्हे दाखल करून ६० हजार १६८ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला तर ५ संशयितांना अटक केली.

त्यानंतर बुधवारी (ता.७) मालेगाव येथील आयेशानगर, आझादनगर, पिंपळगाव बसवंत, सिन्नर व सटाणा पोलिस ठाण्यांच्या हद्दीत कारवाई करून पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Crime News
Nashik Crime: मनमाडला FCIच्या गोदामातून 55 पोते तांदळाची चोरी

त्यांच्याकडूनही हजारो रुपयांचा गुटख्याचा मुद्देमाल जप्त केला आहे. ग्रामीण पोलिसांच्या या कारवाईमुळे गुटखा विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे.

"प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची वाहतूक, साठा व विक्री करणाऱ्यांविरोधात माहिती देण्यासाठी नागरिकांनी ६२६२२५६३६३ क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच, गुटखाविरोधी मोहीम अधिक व्यापक करण्यासंदर्भात विशेष पोलिस पथकांना सूचना केलेल्या आहेत."

- शहाजी उमाप, पोलिस अधीक्षक, नाशिक ग्रामीण.

Crime News
Amravati Crime : कपडे बदलताना मोबाईलने चित्रीकरण करणाऱ्यास चोपले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.