Nashik Rural Police Recruitment : शहर पोलीस आयुक्तालयाच्या भरतीमध्ये मराठा उमेदवारांच्या प्रवर्ग गोंधळाची स्थिती उद्भवली, तशीच स्थिती नाशिक ग्रामीण पोलीस दलाच्या भरतीतही आहे. या प्रवर्गाच्या गोंधळामुळे इडब्ल्युएसमधून (आर्थिक दूर्बल घटक) उत्तीर्ण झालेल्या महिला उमेदवाराची निवडच रद्द होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (Rural Police Recruitment Chance of canceling candidature of women passed from EWS)
महाराष्ट्र पोलिस दलात रिक्त शिपाई पदांसाठी भरतीची प्रक्रिया गेल्या दोन महिन्यांपासून सुरू आहेत. मात्र, गेल्या आठवड्यात पोलीस महासंचालक कार्यालयाच्या प्रशिक्षण व खास पथके विभागाच्या अपर पोलिस महासंचालकांनी पत्र जारी करीत, भरतीतील ‘मराठा’ उमेदवारांची निवड ‘ईडब्ल्यूएस’ऐवजी समाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग (एसईबीसी), इतर मागास प्रवर्ग (ओबीसी) किंवा खुल्या प्रवर्गातून करावी आणि तसे हमीपत्र संबंधित उमेदवारांकडून घेण्याच्या सूचना केल्या आहेत.
गेल्या आठवड्यात नाशिक शहर व ग्रामीण पोलीस दलाने लेखी परीक्षेनंतर निवड यादी जाहीर केली. त्यानुसार कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. मात्र त्यानंतर अपर महासंचालक कार्यालयाकडून आलेल्या सूचनेमुळे इडब्ल्युएस गटातून निवड झालेल्या मराठा समाजाच्या उमेदवारांसमोर प्रश्न उभा राहिला आहे. (latest marathi news)
पोलीस प्रशासनाकडून संबंधित उमेदवारांना इडब्ल्युएस ऐवजी एसइबीसी, ओबीसी वा खुल्या प्रवर्गाचा पर्याय दिला आहे. परंतु हमीपत्र देण्यास उमेदवारांनी नकार दिल्याने शहर पोलीसांनी पुन्हा पोलीस महासंचालकांकडे मार्गदर्शन मागविले आहे. तर, दुसरीकडे ग्रामीण पोलीस दलात इडब्ल्युएस गटातून एका महिला उमेदवारास ग्रामीण पोलीस प्रशासनाने इएसबीसी, ओबीसी वा खुल्या प्रवर्गात समावेश केला आहे.
त्यामुळे या प्रवर्गातील मेरिट पाहता तिची निवड रद्द होण्याचीच शक्यता अधिक आहे. मात्र, यामुळे इडब्ल्युएसमधून पोलीस भरतीच्या निवड यादीत आलेल्या मराठा समाजाच्या उमेदवारांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला असून, द्विधा मनस्थितीमध्ये ते अडकले आहेत. त्यावरून येत्या काळात राज्यात तणावही निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होते आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.