Nashik Rural Police Recruitment: ग्रामीण पोलीस भरतीच्या धावण्याची चाचणी 19 पासून! भुजबळ नॉलेज सिटीतील वाहतूक मार्गात बदल

Nashik News : नाशिक ग्रामीण पोलीस दलामध्ये पोलीस शिपाई पदाच्या ३२ जागा रिक्त आहेत. यासाठी सुमारे १५ हजार उमेदवारांनी अर्ज दाखल केलेले आहेत.
Rural Police Recruitment
Rural Police Recruitmentesakal
Updated on

Nashik Rural Police Recruitment : नाशिक ग्रामीण पोलीस दलातील रिक्त पोलीस शिपाई पदाच्या ३२ जागांसाठी बुधवारपासून (ता. १९) १६०० मी. धावण्याची चाचणी घेण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर भुजबळ नॉलेज सिटी व आडगाव परिसरातील वाहतूक मार्गात बदल करण्यात आली आहे. तसे आदेश शहर वाहतूक पोलीस शाखेकडून जारी करण्यात आलेले आहेत. (Nashik Rural Police Recruitment Test Run from 19th)

नाशिक ग्रामीण पोलीस दलामध्ये पोलीस शिपाई पदाच्या ३२ जागा रिक्त आहेत. यासाठी सुमारे १५ हजार उमेदवारांनी अर्ज दाखल केलेले आहेत. येत्या बुधवारपासून भरतीसाठी असलेल्या उमेदवारांची १६०० मीटर धावण्याची चाचणी सुरू होते आहे.

ही चाचणी २३ जूनपर्यंत पहाटे ५ ते दुपारी ४ वाजेपर्यंत भुजबळ नॉलेज सिटी ते सावता महाराज चौफुली (मुंबई-आग्रा सर्व्हिस रोड) या दरम्यान होणार आहे. त्यामुळे या मार्गावर वाहतूक या दरम्यान बंद केली जाणार आहे. त्याच अनुषंगाने नाशिक शहर वाहतूक शाखेचे उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी १९ ते २३ तारखेदरम्यान धावण्याच्या चाचणी मार्गांवरील वाहतूक मार्गात बदल केले आहेत. (latest marathi news)

Rural Police Recruitment
T20 World Cup, IND vs CAN: भारत-कॅनडा सामना पावसामुळे रद्द, दोन्हीही संघांना मिळणार पाँइंट्स

* वाहतुकीस बंद मार्ग

- भुजबळ नॉलेज सिटी ते सावता महाराज चौफुली या मार्गावरील दोन्ही बाजूकडील रस्ता सर्व वाहनांसाठी प्रवेश बंद असेल.

* पर्यायी मार्ग

- आडगाव ग्रामीण पोलीस मुख्यालय, मेडिकल कॉलेज, मेडिकल कॉलेज चौफुली मार्गे जा-ये करतील.

Rural Police Recruitment
Baramati : मराठा सेवा संघाने जमविले 500 विवाह, सामाजिक बांधिलकीतून निरपेक्ष भावनेतून उपक्रम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.