Nashik Sahyadri Farms : फलोत्पादन मूल्यसाखळीत ‘सह्याद्री फार्म्स’ची झेप; वर्ष 2023-24 अखेर गाठला 1548 कोटीचा टप्पा

Sahyadri Farms : जगभरातील शेतीउद्योगासमोर हवामान बदल, वाढता उत्पादन खर्च, पुरवठा साखळी, भौगोलिक आणि राजकीय स्वरूपाची अनिश्चितता याची आव्हाने निर्माण झालेली आहेत.
1548 Crore turnover in the year 2023-24 as 'Sahyadri Farms' marches towards progress
1548 Crore turnover in the year 2023-24 as 'Sahyadri Farms' marches towards progressesakal
Updated on

लखमापूर : जगभरातील शेतीउद्योगासमोर हवामान बदल, वाढता उत्पादन खर्च, पुरवठा साखळी, भौगोलिक आणि राजकीय स्वरूपाची अनिश्चितता याची आव्हाने निर्माण झालेली आहेत. याही प्रतिकूल परिस्थितीत ‘सह्याद्री फार्म्स‘ने प्रगतीच्या दिशेने झेपावत वर्ष २०२३-२४ मध्ये १५४८ कोटी उलाढालीचा टप्पा गाठला आहे. ही वाढ मागील वर्षीच्या तुलनेत तब्बल ५५ टक्क्यांनी अधिक आहे. (Sahyadri Farms leap in horticulture value chain reaches 1548 crore by end of year )

उद्योगवाढीतील करपूर्व नफा ११.०८ टक्क्यांसह वाढ घेत ‘सह्याद्री फार्म्स‘ने एकात्मिक मुल्यसाखळीतील स्वत:चे स्थान अजून उंचावले आहे अशी माहिती ‘सह्याद्री फार्म्स’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे यांनी दिली. सह्याद्री फार्म्सची १४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा मोहाडी येथील कंपनीच्या प्रांगणात झाली, त्यावेळी श्री. शिंदे बोलत होते. माणदेशी फाउंडेशनच्या अध्यक्षा चेतना सिन्हा, डॉ. अतुल वडगावकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

श्री. शिंदे म्हणाले की, सह्याद्री फार्म्सने द्राक्षांबरोबरच केळी, डाळिंब आणि अन्य फळांची मूल्यसाखळीही उभी केली असून ही फळे उच्च गुणवत्ता व किफायतशीर दरातून जागतिक बाजारपेठेत स्थान मिळवीत आहेत. कंपनीने आतापर्यंत २६ हजाराहून अधिक शेतकऱ्यांकडून ३ लाख मेट्रीक टनाहून अधिक शेतमाल उत्पादनांची खरेदी केली असून त्यावर प्रक्रिया केली आहे.

सह्याद्री फार्म्सने जागतिक फ्रेश (ताजा) शेतमाल उत्पादनाच्या बाजारपेठेत स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. कंपनी युरोप, मध्य पूर्व आणि आग्नेय आशियातील प्रमुख बाजारपेठांसह ४० हून अधिक देशांमध्ये निर्यात करीत असून भारतातील द्राक्ष निर्यातीतील सर्वात मोठी शेतकरी कंपनी बनली आहे. (latest marathi news)

1548 Crore turnover in the year 2023-24 as 'Sahyadri Farms' marches towards progress
Sahyadri Farms : दगडूशेठ गणपतीला येत्या संकष्टीला सह्याद्री फार्म्सतर्फे द्राक्षांची आरास!

सह्याद्रीचा प्रेरणादायक प्रवास

चेतना सिन्हा यांनी ‘मिळून साऱ्या जणी, पोहोचू प्रगतीच्या दारी’ या विषयावर मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या, ‘महात्मा फुले यांना शेतकऱ्यांचे प्रश्न समजले होते. शरद जोशी यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडली. विलास शिंदे यांनी स्वत:च्या अनुभवातून शेतकऱ्यांना दारिद्र्यातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखविला आहे. ‘सह्याद्री फार्म्स’चा प्रवास शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढविणारा आहे व जगभरातील शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी आहे.‘

डॉ. अतुल वडगावकर यांनी शेतकऱ्यांना आरोग्याबाबत जागरूक राहण्याचे आवाहन केले. आजार झाल्यानंतर धावपळ करण्यापेक्षा अगोदरच योग्यवेळी चाचण्या करून घेणे हितावह असल्याचेही त्यांनी सांगितले. श्री. शिंदे यांनी कंपनीच्या वाटचाली बाबत सादरीकरण केले. द्राक्षतज्ज्ञ मंगेश भास्कर यांनी प्रास्ताविक केले. एच-स्क्वेअर एफपीसी इन्क्युबेशन सेंटरचे सीईओ प्रमोद राजेभोसले यांनी सूत्रसंचालन केले. सह्याद्री फार्म्सचे संचालक रामदास पाटील यांनी आभार मानले. ‘सह्याद्री फार्म्स’चे संचालक, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

''एक दशकाहून अधिक काळ, आम्ही संपूर्ण पुरवठा साखळीमध्ये शाश्वतमूल्य निर्माण करताना शेतकऱ्यांना सशक्त बनवण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. आम्ही नावीन्यपूर्ण, मोठ्या स्वरुपातील आणि जागतिक बाजारपेठांमध्ये आमची पोहोच वाढवत आहोत. आमच्या या वाढीचा फायदा शेतकऱ्यांसोबतच ग्राहकालाही होत आहे. यातून पर्यावरणाचे नुकसान होणार नाही याची पूर्ण काळजी घेत आहोत. किंबहुना यातून पर्यावरण संवर्धनाचे हितच साधले जात आहे. शेतकरी, ग्राहक आणि पर्यावरणाप्रति आम्ही वचनबद्ध आहोत.''- विलास शिंदे, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, सह्याद्री फार्म्स, मोहाडी

1548 Crore turnover in the year 2023-24 as 'Sahyadri Farms' marches towards progress
Nashik Sahyadri Farms: राज्यातील सर्वात मोठा काजू प्रक्रिया प्रकल्प सह्याद्री फार्म्समध्ये कार्यान्वित!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.