नाशिक : विहीर, बोअर, नळ या सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांचे गावनिहाय, स्रोतनिहाय दर महिन्याला स्वच्छता सर्वेक्षण जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे करण्यात आले. त्यात जिल्ह्यातील एक हजार ३८४ पैकी ११ ग्रामपंचायती नागरिकांना मध्यम जोखीमेचे पाणी पिण्यास पुरवठा करत असल्याने या ग्रामपंचायतींना आरोग्य विभागाने पिवळे कार्ड दिले आहे. यात त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, निफाड, कळवण तालुक्यातील ग्रामपंचायतींचा समावेश आहे. (Water resources of 11 gram panchayats in district are at medium risk )