SAKAL Impact : मनपाकडून घरकुल भागात साफसफाई; 4 दिवस सलग स्वच्छता मोहीम

SAKAL Impact : वडाळा युवा मंचातर्फे बिऱ्हाड मोर्चाचा इशारा बाबतचे वृत्त ‘सकाळ’ मध्ये प्रसिद्ध होताच मनपाचा आरोग्य विभाग मंगळवारी (ता. १६) ऍक्शन मोडमध्ये आला.
Ongoing cleaning in the Gharkul area.
Ongoing cleaning in the Gharkul area.esakal
Updated on

SAKAL Impact : वडाळा येथील घरकुल योजना अंतर्गत सावित्रीबाई फुलेनगर येथील नागरी समस्यांबाबत वडाळा युवा मंचातर्फे बिऱ्हाड मोर्चाचा इशारा बाबतचे वृत्त ‘सकाळ’ मध्ये प्रसिद्ध होताच मनपाचा आरोग्य विभाग मंगळवारी (ता. १६) ऍक्शन मोडमध्ये आला. स्वच्छता निरीक्षक संजय गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली २० सफाई कर्मचारी सकाळी ९ वाजताच येथे आले. या भागात असलेल्या सहा ते सात इमारती भोवती साचलेला कचरा साफ करण्याच्या कामाला सुरवात केली. (4 days continuous cleaning campaign in Gharkul area by Municipality )

सकाळी संपूर्ण परिसरात औषध फवारणी करण्यात आली. मात्र येथील समस्या आदी बाबींना किमान तीन ते चार दिवस लागणार असल्याने या ठिकाणी सलग स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे. बांधकाम विभागाचे कर्मचारीदेखील येऊन येथील ड्रेनेज आदी बाबींची दुरुस्ती आणि इमारतींच्या स्लॅबची व इतर कामांची डागडुजी करणार आहेत. अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे यांना सोमवारी (ता. १५) युवा मंचातर्फे निवेदन देण्यात आले होते. (latest marathi news)

Ongoing cleaning in the Gharkul area.
SAKAL Impact : एकाच आवारातील शाळा एकत्रीकरणाचा स्थगिती : सोनी कदम

याबाबत ‘सकाळ’ ने महापालिकेवर बिऱ्हाड मोर्चा काढण्याचा इशारा’ अशा शीर्षकाखाली ही बातमी प्रसिद्ध केली. प्रत्येक मजल्यावर गळती सुरू आहे. स्लॅब पडणे, पाइप तुटणे, चेंबरचे झाकण नसणे, सांडपाणी घरामध्ये साचणे, ड्रेनेज चोकअप, तुटलेले ड्रेनेज साचणारे सांडपाणी त्यामुळे होणाऱ्या आरोग्य समस्या आहेत, अशी नागरिकांची तक्रार आहे.

दरम्यान बातमीद्वारे दखल घेतल्याबद्दल युवामंच, ‘सकाळ चे आणि काम सुरू केल्याबद्दल मनपाचे जय कोतवाल, रमीज पठाण, दिलीप लिंगायत, विजय पालटे, ईश्वर पवार, अभिषेक जाधव, अरविंद साळवे, अनुकूल बोराळे, अनिल निकम आदींनी ग्रामस्थांतर्फे आभार मानले आहेत.

Ongoing cleaning in the Gharkul area.
SAKAL Impact : अमळनेर शहरातील चिखलमय रस्त्यांची दूरूस्ती! नागरिकांना दिलासा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com