SAKAL Impact : बसस्‍थानकांच्या बांधकामांना देणार गती! अरुण सिया यांचे स्पष्टीकरण; आगारनिहाय घेणार आढावा

Latest Nashik News : या दृष्टीने आगारप्रमुखांना, बसस्‍थानक व्‍यवस्‍थापकांना सूचना दिल्‍याची माहिती राज्‍य मार्ग परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक अरुण सिया यांनी दिली.
bus stand construction file photo
bus stand construction file photoesakal
Updated on

नाशिक : जिल्‍हास्‍तरावर बसस्‍थानकांच्‍या प्रस्‍तावित बांधकामांना गती देऊन विक्रमी वेळेत पूर्ण करण्यात येईल. आगार व परिसर नेहमी स्‍वच्‍छ राहावा, या दृष्टीने आगारप्रमुखांना, बसस्‍थानक व्‍यवस्‍थापकांना सूचना दिल्‍याची माहिती राज्‍य मार्ग परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक अरुण सिया यांनी दिली. ‘सकाळ’ मधील वृत्तमालिकेची दखल घेत त्यांनी हे स्पष्टीकरण दिले. (Accelerate construction of bus stations Explained by Arun Siya review)

येत्‍या काळात आगारनिहाय आढावा घेत आवश्‍यक सूचना केल्‍या जातील, अशी ग्‍वाही त्यांनी दिली. प्रवासी हा केंद्रबिंदू मानून परिवहन महामंडळाचे कामकाज सुरू आहे. काही उणिवा ‘सकाळ’ ने निदर्शनास आणून दिल्‍याबद्दल ‘सकाळ’चे आभार मानत आगारप्रमुखांना उणिवा दूर करण्याच्या सूचना दिल्‍याचे ते म्हणाले.

नाशिक शहरातील मेळा बसस्‍थानकापासून तर सिन्नर बसस्‍थानक व इतरही बसस्‍थानकांभोवती अनधिकृत पार्किंग विषयी पोलिस आयुक्‍त, पोलिस अधीक्षक यांच्‍याशी पत्रव्‍यवहार करून बेशिस्‍त वाहनचालकांवर कारवाईची मागणी करणार असल्‍याचेही त्यांनी सांगितले.

निःसंकोच हिरकणी कक्ष वापरा

प्रत्‍येक बसस्‍थानकात स्‍तनपानासाठी महिलांना हिरकणी कक्ष उपलब्‍ध आहेत. सुरक्षिततेच्‍या कारणास्‍तव काही ठिकाणी या दालनाचे दरवाजे बंद ठेवलेले असतात. महिलांनी कक्षाचा वापर करण्यासाठी चौकशी कक्षाशी संपर्क साधावा. हे कक्ष त्‍यांच्‍यासाठीच असून, निःसंकोच वापर करावा, असे आवाहन सिया यांनी केले. (latest marathi news)

bus stand construction file photo
Nagpur : आचारसंहितेच्या धसक्याने फायलींना आला वेग...अनेकांचा ‘गेम’ झाल्याची चर्चा

नवीन बससाठी पाठपुरावा सुरू

नाशिकसह विविध आगारांच्‍या जुनाट बसगाड्या आर्युमान संपल्‍याने स्‍क्रॅप होत आहेत. परिणामी बसगाड्यांची संख्या घटत असल्‍याची स्‍थिती ‘सकाळ’ ने समोर आणली. यासंदर्भात सिया म्‍हणाले, की नवीन बसगाड्या उपलब्‍ध होण्यासाठी मध्यवर्ती कार्यालयाकडे पाठपुरावा सुरु आहे. गाड्या उपलब्‍ध होताच, प्रवासी सेवेसाठी दाखल केल्‍या जातील. ई-बसदेखील टप्प्‍याटप्प्‍याने येत आहेत.

म्‍हणून नाशिक रोडला गर्दी..

नाशिक रोड रेल्‍वेस्‍थानकालगतचे बसस्‍थानक एसटी महामंडळाचे असून, सिटीलिंकने त्‍यांच्‍या ताब्‍यातील जागेचा वापर करण्याबाबत त्‍यांना पत्र दिले होते. परंतु प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी त्‍यांनी महामंडळाच्‍या बसस्‍थानकाच्‍या वापराबाबत विनंती केली. म्‍हणून नाशिक रोडला गर्दी होते. सिटी बस स्‍थलांतरित केल्‍यास प्रवाशांची पायपीट होण्याची शक्‍यता असल्‍याने त्‍यांच्‍या सुविधेसाठी बसस्‍थानक उपलब्‍ध केल्‍याचे सिया यांनी सांगितले.

अशा आहेत उपाययोजना

- पैसे आकारणाऱ्या ठक्‍कर बाजार प्रसाधनगृह कर्मचाऱ्यांवर दंडात्‍मक कारवाई

- बसस्‍थानक, आगारांच्‍या स्‍वच्‍छतेबाबत सूचना

- स्‍वच्‍छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर होणार कारवाई

- जुने सीबीएस बसस्‍थानक बांधकाम दोन वर्षांत होईल पूर्ण

- बसस्थानकातील पोलिस चौक्‍यांमध्ये कर्मचारी नेमणुकीसाठी पत्रव्‍यवहार

- कळवण, सुरगाणा, पेठ, मनमाड बसस्‍थानकांच्‍या नूतनीकरणाला गती

- गड पायथा नांदुरीला सुसज्‍ज बसस्‍थानकाची उभारणी

- लासलगावला बसस्‍थानक कामाचे भूमिपूजन

- बसस्‍थानक, आगार परिसरातील खड्डे बुजविण्याबाबत सूचना

- चालक-वाहकांची गैरसोय होणार नाही, याबाबत खबरदारी

- कळवणसह इतर ठिकाणी सीसीटीव्‍ही होणार कार्यान्‍वित

bus stand construction file photo
Nashik News : दमणगंगा-वैतरणा-देव नदी नदीजोडच्या 5 हजार 710 कोटींच्या प्रकल्पाला मंजुरी : आमदार कोकाटे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.