SAKAL Impact : नासर्डी पुलावरील संरक्षक कठडा बसविण्यास सुरवात

SAKAL Impact : नाशिक- पुणे महामार्गावरील नासर्डी पुलावरील तुटलेला संरक्षक कठडा ‘सकाळ’च्या पाठपुराव्यानंतर नव्याने बसविण्यास सुरवात झाली आहे.
Work in progress for installation of protective wall along with barricading on Nasardi Bridge.
Work in progress for installation of protective wall along with barricading on Nasardi Bridge.esakal
Updated on

SAKAL Impact : नाशिक- पुणे महामार्गावरील नासर्डी पुलावरील तुटलेला संरक्षक कठडा ‘सकाळ’च्या पाठपुराव्यानंतर नव्याने बसविण्यास सुरवात झाली आहे. नासर्डी नदीच्या पुलावरील संरक्षण कठडा अनेक दिवसापासून तुटलेला होता. त्यामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली होती. अपघात झाला असता तर वाहन थेट नदीत कोसळले असते. त्यामुळे जीवितहानी सुद्धा होऊ शकली असती. (Installation of protective wall on Nasardi Bridge has started )

‘सकाळ’ने दखल घेतल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग उपविभाग क्रमांक-१ यांच्याकडून तुटलेल्या कठड्याच्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपाचे पत्र्याचे बॅरिकेटिंग उभारण्यात आले होते. मात्र पंधरा दिवसापूर्वी झालेल्या अवकाळी पावसात वादळामुळे पत्रे सुद्धा उडून गेले होते. या रस्त्यावरून रोज हजारो वाहने प्रवास करतात. त्याचबरोबर अनेक शाळा, कॉलेज रस्त्याच्या आजूबाजूच्या परिसरात आहे.

त्यामुळे रहदारीच्या ठिकाणी नदीवरील कठडा नसल्यामुळे अनेक जणांना आश्चर्य वाटत होते. राष्ट्रीय महामार्ग उपविभाग क्रमांक-१ यांच्याशी संपर्क साधला असता कठड्याचे इस्टिमेट मंजुरीला पाठवलेले आहे. मंजुरी मिळतात काम सुरू होईल असे सांगण्यात आले होते. मात्र आता मंजुरी मिळून कामात सुरवात झाली आहे. (latest marathi news)

Work in progress for installation of protective wall along with barricading on Nasardi Bridge.
SAKAL Impact : चिमठाणे-शिंदखेडा राज्य मार्गावर काटेरी झुडपे काढण्यास सुरवात

''नासर्डी पुलावर संरक्षक कठडा जीर्ण झाला होता. नवीन कठडा बसविण्यासाठी इस्टिमेट मंजुरीसाठी पाठविले होते. म्हणून तात्पुरत्या स्वरूपात पत्र्याचे बॅरिकेटिंग करण्यात आले होते. आता मंजुरी मिळालेली आहे. पूर्वीसारखा पक्क्या स्वरूपाचा संरक्षक कठडा दहा ते बारा दिवसात बसविला जाईल.''- सतीश आहेर, उपविभागीय अभियंता

राष्ट्रीय महामार्ग उपविभाग क्रमांक १

''अलीकडे अनेक असे अपघात घडले आहे की ज्यामध्ये अगोदर जर काळजी घेतली असती तर ते अपघात टाळता आले असते. राष्ट्रीय महामार्ग उपविभाग क्रमांक-१ यांच्या अधिकाऱ्यांचे अभिनंदन की अपघात घडण्याच्या अगोदरच संरक्षित कठड्याचे काम सुरू केले.''-डॉ. मनोहर महाजन, प्राचार्य, पोद्दार इंटरनॅशनल स्कूल

Work in progress for installation of protective wall along with barricading on Nasardi Bridge.
SAKAL Impact : बंद असलेले सिग्नल पुन्हा सुरू!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.